जाहिरात
Story ProgressBack

प्रेमविवाहामुळे भाऊ नाराज, तलवारीने वार करून भावोजीची केली हत्या

Crime News: आरोपीनं आपल्या मित्रांच्या मदतीने भावोजीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत आणखी काही जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.

Read Time: 2 min
प्रेमविवाहामुळे भाऊ नाराज, तलवारीने वार करून भावोजीची केली हत्या
तलवारीने वार करून बहिणीच्या पतीची केली निर्घृण हत्या (प्रतिकात्मक चित्र)

Crime News: बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग मनामध्ये ठेवून भावाने त्यांच्या भावोजीची तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हरियाणातील यमुनानगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अभिषेक असे आहे. अभिषेक आणि रिशुनं वर्षभरापूर्वी लग्न केले होते.   

(नक्की वाचा: प्रेमविवाहमुळे आई नाराज, भरकार्यक्रमात लेकीच्या अपहरणाचा असा रचला डाव Video)

गेल्या वर्षभरापासून हे दोघं जीरकपूर येथे वास्तव्यास होते. रविवारी रात्री अभिषेक आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी यमुनानगर येथे आला होता, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान समजली. 

तलवारीने केला हल्ला

अभिषेक लग्नासाठी यमुनानगरमध्ये येणार असल्याची माहिती रिशुच्या भावाला मिळाली होती. यानंतर रिशुचा भाऊ त्याच्या काही मित्रांसह अभिषेकला भेटण्यासाठी तेथे पोहोचला आणि यादरम्यान त्यांनी अभिषेकवर तलावारीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अभिषेक आणि त्याचे काही मित्र गंभीर  जखमी झाले आहे. पण हल्ल्यामध्ये अभिषेकचा मृत्यू झाला.

(नक्की वाचा: गोंदिया गोळीबाराचं जबलपूर कनेक्शन; गोलू तिवारी हत्या प्रकरणात 7 आरोपींना अटक)

या प्रकरणाबाबत यमुनानगर शहराचे एसएचओ जगदीश चंद्र यांनी सांगितले की, "रिशुच्या भावाचा तिच्या प्रेमविवाहास विरोध असल्याची माहिती तपासाद्वारे समोर आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आणखी काही जणांची चौकशी होणे बाकी आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आढळल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल".

(नक्की वाचा: नूडल्सच्या पाकिटात हिरे, अंडरगार्मेंट्समध्ये सोनं! मुंबई विमानतळावर 6.46 कोटींचा माल जप्त)


VIDEO: Salman Khanच्या घरावर गोळीबार, अटक झालेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी काय संबंध?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination