पंजाबच्या लुधियानामध्ये चार जणांनी मिळून एका महिलेची अब्रू लुटली. इतकंच नाही तर आरोपींनी या नीच कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या महिलेचा भाऊ आरोपींच्या घरातील मुलीसोबत पळून गेल्याने त्याची शिक्षा या निष्पाप महिलेला देण्यात आली. आरोपीची मुलगी पीडितेच्या भावासोबत पळून गेली होती. त्याचा राग आल्याने आरोपीने तरुणाच्या बहिणीची अब्रू लुटली. हा प्रकार 1 मे रोजी घडला होता. मात्र या प्रकारामुळे पीडिता जबरदस्त घाबरली होती, ज्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की या भयंकर कृत्यामुळे बसलेल्या मानसिक आघातातून पीडिता सावरल्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेने रविंदर सिंग, वरिंदर सिंग, अमिन सिंग आणि संतोष सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की तिचा भाऊ आणि मुख्य आरोपी रविंदर सिंगची मुलगी पळून गेले होते.
पीडितेने म्हटलंय की हे प्रेमी युगुल पळून गेल्यांनंतर रविंदर आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. शोध घेत असताना रविंदर त्याच्या साथीदारांसह पीडितेच्या घरी धडकला होता. त्याची मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघे पीडितेच्या घरी लपले असावेत असा संशय रविंदरला येत होता. रविंदरने पीडितेच्या घराची झडती घेतली मात्र त्याला युगुल सापडले नाही. यामुळे त्याने पीडितेला धमकावलं आणि त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसह मिळून पीडितेची अब्रू लुटली. आरोपींनी या दुष्कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, आरोपीने धमकी दिली होती की, पोलिसांत तक्रार केली तर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world