योगेश लाठकर, नांदेड
Nanded Crime News : आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील तामसा गाव या घटनेमुळे हादरले आहे. मधुकर मारोतराव तुपेकर (वय 55 वर्षे) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्येप्रकरणी दत्ता मधुकर तुपेकर (वय 23 वर्षे) याला तामसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 30 एप्रिलला रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमके काय घडले?
मधुकर तुपेकर यांनी नेहमीप्रमाणे पत्नीसोबत वाद घालत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळेस आईला का मारहाण करता? अशी विचारणा करताच मधुकर तुपेकरने मुलगा दत्ता तुपेकरलाही मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे चिडलेल्या दत्ताने रागाच्या भरात वडिलांची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन, तामसा पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे घटनास्थळी दाखल झाले व आरोपी मुलाला त्यांनी ताब्यात घेतले.
(नक्की वाचा: रिक्षा पार्किंगवरून निर्घृण हत्या, 5 वर्षांनंतर कुटुंबीयांना मिळाला न्याय! आरोपींना जन्मठेप)
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
यादरम्यान 1 मे रोजी तामसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. यादरम्यान दिलीप मारोतराव तुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा: पतीला थाटायचा होता दुसरा संसार, पहिल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी रचला असा डाव)
VIDEO: मोदींच्या टीकेवरून महाराष्ट्रात राजकारण, आव्हाडांचा भाजपला महत्त्वाचा प्रश्न?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world