जाहिरात

Inspirational story : इच्छाशक्तीला सलाम! वयाच्या 76 व्या वर्षी आजोबा 12 वी पास, आता तयारी वकिलीची

आजोबा इथवर थांबले नाहीत, बारावीच्या परीक्षेनंतर त्यांना कायद्याचं शिक्षण घ्यायची इच्छा आहे. यासाठी त्यांनी CET परीक्षा देखील दिली आहे. 

Inspirational story : इच्छाशक्तीला सलाम! वयाच्या 76 व्या वर्षी आजोबा 12 वी पास, आता तयारी वकिलीची

मनोज सातवी, प्रतिनिधी 

इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.  या परीक्षेत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागातून विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये यंदा राज्याचा निकाल 91.88 टक्के इतका लागला असून यामध्ये कोकण विभाग सर्वाधिक म्हणजेच 96. 74 टक्क्यांवर आहे. तसेच लातूर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 89. 46 टक्के इतका लागला आहे. 

प्रत्येकाच्या आयुष्यात बोर्डाची परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा असतो. बोर्डात मिळवलेले टक्के आणि यासाठी केलेली मेहनत आयुष्यभर लक्षात राहते. मात्र शिक्षणाला कुठलंही बंधन नसते. शिकण्यासाठी वयाचंही बंधन नसते. केवळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्ही यश नक्कीच मिळवू शकता. हे सिद्ध करून दाखवलंय वसईतील गोरखनाथ मोरे या 76 वर्षीय आजोबांनी.

HSC Result 2025 : बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरला, गेल्या 4 वर्षात किती होती टक्केवारी?

नक्की वाचा - HSC Result 2025 : बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरला, गेल्या 4 वर्षात किती होती टक्केवारी?

तरुणपणी नेव्हीमधे नोकरी लागली त्यावेळी मोरे यांचे 11 वीपर्यंतच शिक्षण झालं होतं. तब्बल 32 व्या वर्षी नेव्हीतील नोकरी आणि संसाराचा गाडा यामुळे इच्छा असूनही मोरे यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आणि वकील बनायचं हे गोरखनाथ मोरे यांचं स्वप्न होतं. मात्र संसारामुळे ते करणं शक्य झालं नाही. मात्र यंदा गोरखनाथांनी आपली इच्छा पूर्ण केली. त्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि मोरे यांनी 45 टक्के गुण मिळवले. हा आकडा कमी असला तरी वयाच्या 76 व्या वर्षी आजोबांनी अभ्यास करीत पास होऊन दाखवलं. गोरखनाथ हे अनेकांसाठी आदर्श ठरले आहेत. इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य करता येतं हेच त्यांच्या या कामगिरीवरुन लक्षात येतं. ते इथवर थांबले नाहीत. त्यांना वकील व्हायचंय. वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी CET परीक्षा देखील दिली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

शिक्षक आणि कुटुंबाची मोलाची साथ

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोरखनाथांनी वसईच्या न्यू इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेजमध्ये बारावी कला शाखेत प्रवेश घेतला होता. बारावीचा निकाल समजला आणि मोरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या प्रयत्नांना कुटुंबीय तसेच न्यू इंग्लिश स्कूल मधील शिक्षक वर्गाने देखील मोलाची साथ दिल्याचे मोरे यांनी सांगितले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com