जाहिरात

Malvan Statue : जयदीप आपटेच्या पत्नीची चौकशी , सिंधुदुर्ग पोलिसांनी नोंदवला जबाब

पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर जयदीप आपटे आपल्या राहत्या घरातून पळून गेला आहे.

Malvan Statue : जयदीप आपटेच्या पत्नीची चौकशी , सिंधुदुर्ग पोलिसांनी नोंदवला जबाब
मुंबई:

मालवणातील राजकोट (Malvan Rajkot Fort)  किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) यांचा पुतळा कोसळला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि  बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील यांना प्रमुख आरोपी करण्यात आले आहे. पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर जयदीप आपटे आपल्या राहत्या घरातून पळून गेला आहे. त्याचे कुटुंबीय देखील कल्याणमधील त्याच्या घरी नसल्याचे दिसून आले आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेची बायको निशिगंधा हिच्याशी संपर्क साधला असून ती तिच्या माहेरी असल्याचे त्यांना कळाले. सिंधुदुर्ग पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. जयदीप आपटे कुठे आहे, याचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असून निशिगंधा हिचा जबाब याचाच एक भाग आहे.  

कारणे शोधण्यासाठी समितीची स्थापना

मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.     

बैठकीला नौदलाचेही अधिकारी उपस्थित

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' निवासस्थानी येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती.या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते. 

पुतळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या साक्षीदाराचा VIDEO आला समोर; गोळीबारानंतर नेमकं काय घडलं? पाहा
Malvan Statue : जयदीप आपटेच्या पत्नीची चौकशी , सिंधुदुर्ग पोलिसांनी नोंदवला जबाब
triple-murder-in-karjat-three-bodies-found-by-riverside-during-ganpati
Next Article
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड? ऐन गणपतीत नदी काठी आढळले तिघांचे मृतदेह