
अमजद खान
दहावीची परिक्षा सुरू झाली आहे. या परिक्षेत आपल्या मुलीला चांगलं यश मिळाव म्हणून लेकीसह आई वडील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते. कुटुंबीयांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर हे कुटुंब आपल्या घरी म्हणजेच डोंबिवलीकडे निघाले. त्यांनी ट्रेनही पकडली. ते डोंबिवलीला पोहोचले. आई वडील लोकलमधून उतरले, गाडीला गर्दी होती. पण त्या गर्दीतच ती मुलगी अचानक गायब झाली. काय घडलं हे तिच्या आईवडीलांना काही क्षण समजलचं नाही. पण त्यानंतर पुढे जे काही घडले त्याने हे संपुर्ण कुटुंब हादरून गेलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंबिवलीतील भोपर परिसरात हे कुटुंब राहातं. घरातली मोठ्या मुलीची दहावीची परिक्षा सुरू होणार होती. त्या आधी म्हणजे 18 तारखेला हे कुटुंब दर्शनासाठी म्हणून सिद्धीविनायकला गेले होते. दर्शन झाल्यानंतर हे कुटुंब संध्याकाळी डोंबिवलीला परतले. त्यावेळी त्यांची मुलगी डोंबिवलीच्या गर्दीत त्यांना दिसलीच नाही. तिची शोधा-शोध करण्यात आली. पण ती सापडली नाही. ती बेपत्ता झाली होती. आई वडील तिला वणवण शोधू लागले. त्यांनी रेल्वे पोलीसातही धाव घेतली. मग पोलीसांनी सर्व सुत्र हलवली.
ट्रेंडिंग बातमी - DCM एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे कोण? का दिली धमकी?
रेल्वे पोलीसांनी सर्वात आधी डोंबिवली स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात ही मुलगी आसनगाव रेल्वेत चढताना दिसली. त्यानंतर पोलीसानी आपल्या तपासाचा वेग वाढवला. त्याच वेळी मुलीच्या वडीलांना एक फोन आला. त्यात सांगितलं गेलं की तुमची मुलगी आसनगाव रेल्वे स्थानका जवळ रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत सापडली आहे. हे ऐकून तिचे वडील हादरून गेले. हा फोन रेल्वे पोलीसांनीच केला होता. त्यानंतर मुलीचे आई वडील तातडीने आसनगावकडे निघाले.
आई वडील आसनगाव रेल्वे स्थानकात पोहचले. त्यावेळी तिथे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे होते. त्यांनी ही मुलगी ट्रेनमधून पडल्याचे सांगितले. त्यात ती जखमी झाली. त्यानंतर नंतर तिचा मृत्यू झाला असं तिच्या पालकांना सांगितलं. मुलगी ट्रेनमधून कशी काय पडली याचा तपास सुरु आहे. ही या बाब मुलीच्या आईवडीलांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
मुलीला दहावीच्या परिक्षेत चांगलं यश मिळालं यासाठी आई वडील देवदर्शनाला गेले होते. त्याच मुलीचा मृत्यू झाला. तिच्या उज्जव भविष्याचं स्वप्न तिचे आई वडील पाहात होते. पण तिच या जगातून निघून गेली आहे. ही मुलगी आसनगावच्या लोकलमध्ये का चढली? ती रेल्वेतून खाली पडली की तिच्या बरोबर काही घातपात झाला आहे याबाबत आता पोलीस आपला तपास करत आहेत. दहावीच्या परिक्षेच्या काही तास आधीच ही घटना समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world