जाहिरात

रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून नवी मुंबई हादरली, मृत तरुण मुलुंडचा असल्याची माहिती

अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीएनएस कलम 103(1) च्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून नवी मुंबई हादरली, मृत तरुण मुलुंडचा असल्याची माहिती
नवी मुंबई:

राहुल कांबळे

5 ऑगस्ट रोजी घणसोलीच्या एखा फास्ट फूड दुकानाजवळ एक मृतदेह सापडला. सकाळी साडेआठच्या सुमारास हा मृतदेह दिसून आल्याने नवी मुंबईत जबरदस्त खळबळ उडाली आहे. बेलापूर-ठाणे रस्त्यावरील घणसोलीमध्ये हा मृतदेह सापडला आहे. रबाळे पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीमध्ये की, पोलिसांनी मंगळवारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीएनएस कलम 103(1) च्या तरतुदीनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतर मृत व्यक्तीचे नाव सुशील कुमार रामसजीवन बिंद असल्याचे कळाले आहे. हा तरुण 25 वर्षांचा होता.सुशीलची हत्या झाली तेव्हा तो कामानिमित्त घणसोलीला आला होता. यावेळी अज्ञातांनी त्याची हत्या केली आणि त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. नवी मुंबई  पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून नवी मुंबई हादरली, मृत तरुण मुलुंडचा असल्याची माहिती
Woman knifes boyfriend's private parts after he refuses to marry her Thane Bhivandi
Next Article
लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने केले चाकूने वार