जाहिरात

Pune News: पुण्याच्या हायप्रोफाईल सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये धाकधूक, एका CCTV व्हिडीओनं अनेकांची झोप उडवली

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये झालेल्या मोबाईल चोरीच्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune News: पुण्याच्या हायप्रोफाईल सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये धाकधूक, एका CCTV व्हिडीओनं अनेकांची झोप उडवली
Pune Mobile Robbery CCTV Video
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune CCTV Video Viral : पुण्यातील वडगाव शेरी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये झालेल्या मोबाईल चोरीच्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित चोरट्याने सोसायटीतील चार मोबाईल फोन लंपास केल्याची माहिती समोर आली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,चोरटा सोसायटी परिसरात संशयास्पदरीत्या वावरत होता.संधी साधून त्याने रहिवाशांचे चार मोबाईल फोन चोरून नेले.चोरी झाल्यानंतर सोसायटी व्यवस्थापनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित व्यक्ती चोरी करताना स्पष्टपणे दिसून आली. फुटेजमध्ये कैद झालेला संशयित हा सराईत गुन्हेगार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नक्की वाचा >> MP News : एका अफवेमुळं कुटुंबे उद्ध्वस्त, समोरून येणाऱ्या एक्स्प्रेसची प्रवाशांना धडक, ट्रॅकवर मृत्यूचं तांडव

सोसायट्यांमध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून वडगाव शेरीतील विविध सोसायट्यांमध्ये अशाच प्रकारच्या मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

नक्की वाचा >> Big News: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यातील बळीराजा सुखावणार, सरकारकडून 836 शेतकऱ्यांना मिळणार 50 लाखांची मदत

पोलिसांकडून  नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

परिसरातील इतर चोरीच्या घटनांशी या संशयिताचा काही संबंध आहे का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.दरम्यान,पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सोसायट्यांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासह अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com