जाहिरात

Titwala News : कोहळा, लिंबू, कोंबडीचे पाय; टिटवाळ्यातील भाडेकरूच्या घरासमोर संशयास्पद हालचाली, पोलिसांत तक्रार

टिटवाळा येथील गजानन पॅलेस सोसायटीतील एका भाडेकरूच्या घरासमोर संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Titwala News : कोहळा, लिंबू, कोंबडीचे पाय; टिटवाळ्यातील भाडेकरूच्या घरासमोर संशयास्पद हालचाली, पोलिसांत तक्रार

Titwala News : टिटवाळा येथील गजानन पॅलेस सोसायटीतील एका भाडेकरूच्या घरासमोर संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. गजानन पॅलेस सोसायटीच्या ए-विंगमधील एका घरासमोर एका अज्ञात व्यक्तीने कोहळा, लिंबू, कोंबडीचे पाय आणि त्याला चार टाचण्या टोचून तेथेच ठेवुन निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाला असून संबंधित व्यक्तीचे फुटेज उपलब्ध आहे. मात्र चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

सुरुवातीला या घटनेची माहिती सोसायटीतील इतर रहिवाशांना नव्हती. संबंधित भाडेकरूच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात याची चर्चा सुरू झाली. या घटनेमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नक्की वाचा - Badlapur News : जेजेनंतर बदलापुरातील नामांकित ब्लड बँकेला टाळं; तुकाराम मुंढे आता 'रक्तचोरी'चा भांडाफोड करणार

सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी...

घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन या कृत्यामागील उद्देश उघड करावा आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तक्रार दाखल करताना ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना), विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप पूनमचंद राठोड, भाऊसाहेब घोडके, ॲड. महेश गायकवाड तसेच मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनसेने सोसायटी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करून संबंधित व्यक्तीची ओळख पटावी आणि आवश्यक तांत्रिक तपासाद्वारे या प्रकारामागील नेमका हेतू स्पष्ट करावा, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अंधश्रद्धेला बळी न पडता संशयास्पद घटना अथवा हालचालींची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com