जाहिरात

Kolhapur News : ऊसाच्या शेतात अडीच महिन्यांचं अर्भक अन् शेजारी मिठाची पिशवी; शेतकरी हादरला!

नवजात अर्भक पुरण्यामागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Kolhapur News : ऊसाच्या शेतात अडीच महिन्यांचं अर्भक अन् शेजारी मिठाची पिशवी; शेतकरी हादरला!

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील तळंदगे या गावात एका शेतात नवजात अर्भक पुरल्याचा (Newborn infant) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साधारणतः दोन ते अडीच महिन्याचं अर्भक पुरल्याचं आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे अर्भक अनैतिक संबंधातून किंवा लिंग चाचणी केल्यानंतर गर्भपात करून पुरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हुपरी पोलीस अधिकारी आणि अप्पर तहसीलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, तळंदगे येथील धोंडिबा फडतरे यांच्या ऊसाच्या शेतात पुरलेल्या या अर्भकामुळे गावात खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास फडतरे हे आपल्या शेतात गेले होते. येथे त्यांना त्यांच्या शेतामध्ये खड्डा खणलेला दिसून आला. त्याचबरोबर खड्ड्याच्या शेजारी मिठाची पिशवी आणि इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. हे सगळं दृश्य दिसल्यानंतर फडतरेंना धक्काच बसला. यांनी या घटनेची माहिती पाटील गावचे पोलीस यांना दिली. त्यानुसार हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अप्पर तहसीलदारांनी घटनास्थळाला भेट दिली.

नक्की वाचा - रस्ते खोदकामादरम्यान आढळले 4 मानवी सांगाडे; रात्रीच्या अंधारात धक्कादायक प्रकार उघड

नवजात अर्भक पुरण्यामागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र लिंग चाचणी केल्यानंतर गर्भपात करून पुरल्याचा संशय आहे, याशिवाय अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com