
Ulhasnagar Crime : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये पोलीस एका शाळेत विद्यार्थिनींना गुड टच, बॅड टचचे धडे द्यायला गेले होते. त्याचवेळी हे सर्व एकताना एका चिमुरडूसोबत घृणास्पद कृत्य होत असल्याचं लक्षात आलं. या चिमुकलीचा बापचं आपल्यासोबत हे दुष्कर्म करत असल्याचं उमगलं अन तिनं याबाबत शिक्षिकेला सांगितलं. या नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगरात आरोपी बाप हा त्याच्या दोन मुलींसह वास्तव्याला असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली आहे. यानंतर आपल्या मोठ्या मुलीच्या बाल अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यानं तिच्यावर अत्याचार करीत होता. मात्र मुलीला हा सर्व प्रकार लक्षात येत नव्हता. अशातच या मुलीच्या शाळेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांकडून एका शाळेत गुड टच आणि बॅड टचची माहिती देण्यात आली.
नक्की वाचा - Shocking incident: भाजप नेत्याने आपल्या 3 मुलांना गोळ्या घालून केलं ठार, पत्नीला ही घातल्या गोळ्या
ते ऐकून या चिमुरडीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं. याबाबत तिने शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर शिक्षिकेनं पोलिसांच्या मदतीनं तिच्या आईला ही बाब सांगितली. याबाबत आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या नराधम बापाविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला असून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world