
Ulhasnagar News: डोंबिवलीमध्ये ड्रग्जची अवैध विक्री करणारं रॅकेट पोलिसांनी उद्धवस्त केलं आहे. त्यापाठोपाठ आता कल्याण जवळच्या उल्हासनगरमध्ये विदेशी दारुचा मोठा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. परदेशातील दारुची राज्यात विक्री करायची असल्यास त्यावर मोठे उत्पादन शुल्क भरावे लागते. पण, ते शुल्क चुकवून त्याची विक्री उल्हासनगरमध्ये सुरु होती. धक्कादाक बाब म्हणजे लॅपटॉप दुकानाच्या आडून विक्रीचा हा सर्व प्रकार सुरु होता, अशी माहिती आता उघड झाली आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या इतर साथीदाराचा शोध सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाच्या भरारी पथकाने उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. या पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर येथील एका प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक दुकानावर छापा टाकाला.
(नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
या दुकानामध्ये लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची अधिकृत विक्री केली जात होती. पण, त्याच्याआड विदेशी दारूचा साठा लपवून ठेवण्यात आला होता आणि तो विक्रीसाठी वापरला जात होता.
या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी कमलेश जयरानी या दुकानमालकाला अटक केली असून, त्याचे इतर साथीदार सध्या फरार आहेत. त्यांचा तपास सुरु आहे. उल्हासनगर परिसरातली लग्न समारंभ, पार्टीसाठी ही दारु पुरवली जात होती. कॅनडा, इंग्लंड, दुबईमधून ही दारु आणली जात होती, अशी माहिती आहे. या छापासत्रामध्ये जप्त केलेल्या दारुची अंदाजे किंमत 3.5 लाख रुपये इतकी आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world