जाहिरात

CCTV Video : "धंदा करायचा असेल तर महिन्याला हफ्ता द्या.." डोंबिवली देसलेपाड्यात गावगुंडांची दहशत, एकाला चोपलं

डोंबिवली- डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरात भंगार दुकानदाराकडे दर महिन्याला हप्ता देण्याची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाहा सीसीटीव्ही व्हिडीओ..

CCTV Video : "धंदा करायचा असेल तर महिन्याला हफ्ता द्या.." डोंबिवली देसलेपाड्यात गावगुंडांची दहशत, एकाला चोपलं
Dombivali Groons Video Viral
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Dombivali Shocking Video : डोंबिवली- डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरात भंगार दुकानदाराकडे दर महिन्याला हप्ता देण्याची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानदाराने नकार दिल्याने दुकानदाराच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडलीय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. गावगुंडांनी या परिसरात दहशत पसरवल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

'भंगारचे सामान दुकानाबाहेर का ठेवले आहे?', नंतर झाला राडा

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरात पंकज मौर्या यांचे भंगाराचे दुकान आहे. 18 जानेवारीला संध्याकाळी पंकज यांचे वडिल विनोद मौर्या दुकानासमोर बसले होते.दुकानातील काही भंगार दुकानाबाहेर ठेवले होते.विनोद यांच्या ओळखीचा एक तरुण त्याठिकाणी आला. सागर काटेकर असं त्याचं नाव आहे. भंगारचे सामान दुकानाबाहेर का ठेवले आहे? असं त्याने विचारलं. यावर विनोद म्हणाला, हे सामान दुसरीकडे न्यायचे आहे.त्यासाठी गाडी बोलाविली आहे.हे ऐकल्यावर सागर आणि त्याच्या दोन साथीदारांना विनोद यांना बेदम मारहाण केली. 

नक्की वाचा >> शिंदेंना शह देण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी, उद्धव ठाकरेंनी केला CM फडणवीसांना संपर्क? पाहा व्हिडीओ

इथे पाहा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ

त्यानंतर त्यांचा मुलगा पंकज त्याठिकाणी आला. दोघे बापलेक मापनाडा पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला .मात्र ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे. तशी ठोस कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नसल्याचा आरोप पंकज मौर्या यांनी केला आहे.पंकज मौर्या यांचे म्हणणे आहे  की ,सागर कोटकर हा काही दिवसांपूर्वी दुकानात आला होता.दर महिन्याचा हप्ता दिला पाहिजे.नाही दिला तर धंदा करु देणार नाही अशी धमकी त्याने दिली. आमची पोलिसांकडे एकच मागणी आहे की, त्याच्या विरोधात ठोस  कारवाई करुन त्यांची दहशत मोडीत काढली पाहिजे.असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे.

नक्की वाचा >> Pandharpur News 'त्या' गूढ आवाजामुळे पंढरपूर हादरलं, नागरिक भीतीच्या छायेत, भूकंप की आणखी काय? पाहा Video

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com