![Viral Video: आधी उघडा झाला ,मग दुकानात घुसला...चोराची चोरी करण्याची भलतीच पद्धत Viral Video: आधी उघडा झाला ,मग दुकानात घुसला...चोराची चोरी करण्याची भलतीच पद्धत](https://c.ndtvimg.com/2025-02/32qbr7d8_crime_625x300_14_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
चोर चोरी करताना कोणती पद्धत वापरेल हे सांगता येत नाही. पण एक असा चोर समोर आला आहे, ज्याने चोरी करताना जी पद्धत वापरली आहे ती कोणताच चोर वापरणार नाही हे नक्की आहे. या चोराचा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर जोरादार व्हायरल होत आहे. ही चोरी उल्हासनगरमध्ये झाली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलं आहे. शिवाय या चोरीची एकच चर्चा उल्हासनगरमध्ये रंगली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उल्हासनगर शहरात कॅम्प 5 मध्ये गायकवाड पाडा आहे. या ठिकाणी सुनील गुप्ता यांचं ओम साई राम कम्युनिकेशन हे दुकान आहे. या दुकानात ते मोबाईल विकतात. याच दुकानात चोराने चोरी केली. पण चोरी करतानाची त्याची पद्धत ही भलतीच आणि किळसवाणी होती. मध्य रात्रीच्या सुमारास हा चोरटा दुकानाचे पत्रे काढून दुकानात घुसला. धक्कादायक बाबमध्ये चोरी करताना चोराने एकही कपडा आपल्या अंगवार घातला नव्हता. तो पुर्ण पणे नग्न होता.
ट्रेंडिंग बातमी - MMR मध्ये नवी 1 लाख घरं, अवघ्या 15 लाखात, कुठे कराल नोंदणी? कोण ठरणार पात्र?
तो नग्न अवस्थेतच दुकानात घुसला. चेहरा ओळखू नये म्हणून त्याने तोंडाला अंडरवेअर बांधली होती. दुकानात प्रवेश केल्यानंतर तो जे काही करत होता ती त्याची प्रत्येक कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत होती. त्याने आधी मोबाईल ताब्यात घेतले. त्यानंतर हेडफोन ही चोरले. गल्ल्यात असलेली रोख रक्कमही त्याने घेतली. चोरी केल्यानंतर या चोराने कहर केला. त्याने दुकानातच संडास केली. त्यानंतर तो मुद्देमाल घेवून दुकानातून पसार झाला.
आचरटपणावर निष्ठा, चोराने केली विष्ठा; उल्हासनगरमध्ये भोंगळ्या चोराचा भयंकर प्रकार#ulhasnagar #ndtvmarathi pic.twitter.com/GSkdsFrvCG
— NDTV Marathi (@NDTVMarathi) February 14, 2025
सकाळी जेव्हा दुकानाचे मालक सुनिल गुप्ता दुकानात आले. दुकान उघडल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचा अंदाज आला. त्यांनी निट पाहिल्यानंतर दुकानाचे पत्रे अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. त्यांनी त्याच वेळी दुकानातील सीसीटीव्ही चेक केले. त्यात त्यांना रात्री उशिरी चोर आल्याचे आढळून आले. शिवाय त्याने मोबाईल चोरी केल्याचेही त्यात स्पष्ट पणे दिसत होते. मोबाईल बरोबर दोन हजाराची रोकडही चोरीला गेल्याचे सुनिल गुप्ता यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - Ongole cow: गाय आहे की काय आहे? गायीची किंमत तब्बल 410000000 रुपये
या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या चोरीच्या घटनेनं उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याची चर्चाही जोरदार होत आहे. चोराने चोरी केली पण त्याची पद्धत आणि चोरीनंतर केलेले कृत्य यामुळे मात्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा विकृत चोराला तातडीने पकडावे अशी मागणी आता केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world