
अमजद खान, प्रतिनिधी
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण प्रकरणात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा आणि नंतर तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीचा एन्काऊंटर करा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून केली जात असताना विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
डिसेंबर महिन्याच्या 23 तारखेला विशाल गवळीने एका चिमुरडीचं अपहण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत हत्या केली होती. बदलापूर प्रकरण ताजं असताना हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. यादरम्यान अधिक चौकशी केली असता यापूर्वीही विशाल गवळीने अनेक चिमुकलींना शिकार बनवल्याचं समोर आलं होतं. हा वर्षापासून विशाल गवळीकडून अल्पवयीन मुली मुलांवर लैंगिक अत्याचार सुरु असल्याचं उघडकीस आलं होतं. त्याच्यावर अनेक गुन्हाची प्रकरणंही नोंदवलेली आहेत. त्यामुळे अशा नराधमाला कडक शिक्षा करण्याची मागणी राज्यभरातून केली जात होती.
नक्की वाचा - Kalyan Crime: 60 दिवसात 1006 पानाचं दोषारोपपत्र, विशाल गवळी विरोधात जबरी पुरावे
कल्याणचा संपूर्ण घटनाक्रम
- 23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते.
- आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती.
- अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला.
- मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली.
- 24 डिसेंबर रोजी मुलीच्या मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला.
- मुलीच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला.
- शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
- पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचेही नाव समोर आले आहे.
- विशाल गवळी याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
- घटनेच्या विरोधात नागरिकांनी आज निषेध मोर्चा काढला.
- आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
- विशाल गवळी याला त्याच्या पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कल्याणमधील विशाल गवळीची सगळी कुंडली:
- 2015 साली प्राणघातक हल्ला
- 2016 साली एका अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार
- 2019 साली विशाल गवळीला तडीपार केले हाेते. मात्र त्याने आदेशाचा भंग केला. या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
- 2020 मध्ये पुन्हा तडीपारीचा आदेश भंग केला.
- 2021 मध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार
- 2022 मध्ये लुटीची घटना
- 2023 मध्ये अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
- त्यानंतर आत्ता 2014 साली अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्यााचर करुन तिची हत्या केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world