जाहिरात

Crime News : कल्याणमध्ये काय चाललंय? मुलीला उचलण्याची धमकी, भर रस्त्यात तरुणाला मारहाण, कारण काय?

Kalyan Crime News : मुंबईजवळची कल्याण-डोंबिवली ही शहरं आणि जवळपासचा परिसर गुन्हेगारी कारणांमुळे वारंवार चर्चेत आहेत.

Crime News : कल्याणमध्ये काय चाललंय? मुलीला उचलण्याची धमकी, भर रस्त्यात तरुणाला मारहाण, कारण काय?
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

मुंबईजवळची कल्याण-डोंबिवली ही शहरं आणि जवळपासचा परिसर गुन्हेगारी कारणांमुळे वारंवार चर्चेत आहेत. कल्याण ग्रामीणमधील कोळेगावातही असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय. या गावात दोन कुटुंबीयांचे जोरदार भांडण झाले. यावेळी एका तरुणानं दुसऱ्या कुटुंबातील मुलगी उचलून नेण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार समजल्यानंतर गावातील तरुणांनी मध्यस्थी केली. या प्रकाराचा राग येऊन मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला जोरदार मारगाण करण्यात आली आहे.

मिलिंद मढवी असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्यानं आदित्य मढवी नावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. चारचाकीमधून काढून भररस्त्यात त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या प्रकरणात आत्ता मानापाडा पोलिसांनी तपास सुरु केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कल्याण ग्रामीणमधील उसाटणे गावात दोन भाडोत्रींमध्ये वाद झाला. या वादात मिलिंद मढवी या तरुणाने एका भाडोत्रीच्या भाजूने उभा राहिला. दोन कुटुंबियाच्या भांडणात एकाला दुखापत झाली होती. त्याची तो भरपाई मागत होता. मिलिंद मढवीने भरपाई मागणाऱ्या व्यक्तीला तुमची मुलगी उचलून नेईल, अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार समजल्यानंतर गावातील काही लाेक मिलिंद मढवीला समजविण्यासाठी गेले. 

या वेळी आदित्य मडवी नावाच्या तरुण त्या ठिकाणी होता त्याने देखील मिलिंदची समजूत काढली होती . या गोष्टीचा मिलिंद याला राग आला. त्याचा वचपा काढण्यासाठी मिलिंद याने आठ ते दहा जणांना सोबत घेऊन कोळगाव येथे आला. मंगळवारी दुपारी जेव्हा आदित्य मढवी घरातील एका मुलीला शाळेत साेडून येत होता त्याच्या वाहनाला मागून गाडीने धडक दिली. त्याचं वाहन आडवून भर रस्त्यात आदित्यला गाडीतून खेचून बाहेर काढले. त्याला बेदम मारहाण केली.

( नक्की वाचा : कल्याणच्या पीडितेचा खटला उज्ज्वल निकम लढणार, आरोपीच्या फाशीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा )
 

या मारहाणीत आदित्य जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी मिलिंद मढवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com