जाहिरात

Kalyan Crime कल्याणच्या पीडितेचा खटला उज्ज्वल निकम लढणार, आरोपीच्या फाशीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा

Kalyan Crime Case : कल्याणमधील लैगिंक अत्याचार हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (शनिवार, 28 डिसेंबर) भेट घेतली.

Kalyan Crime  कल्याणच्या पीडितेचा खटला उज्ज्वल निकम लढणार, आरोपीच्या फाशीबाबत  फडणवीसांची मोठी घोषणा
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याणमधील लैगिंक अत्याचार हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (शनिवार, 28 डिसेंबर) भेट घेतली. दोन ते तीन महिन्यात हा खटला चालविला जाईल. आरोपीला फाशी झाली पाहिजे याची आम्ही काळजी घेतली आहे. या खटल्यात ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम हे काम पाहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री  दिली आहे. दुसरीकडे पोलिसानी तपासा दरम्यान मयत मुलीचे कपडे आणि हत्यार जप्त केल्याची माहिती आहे. विशाल गवळी हा कुणाचा कार्यकर्ता आहे. यावरुन महेश गायकवाड आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आहे. 

कल्यामधील पीडित मुलीचे वडिल यांना घेऊन भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलींच्या वडिलांची व्यथा ऐकून घेतली. गवळी हा परिसरात गांजा विक्रीचा धंदा करायचा. त्याची परिसरात दहशत होती, अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केली. 

त्यानंतर या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम काम करतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना दिलं. दोन ते तीन महिन्यात आरोपींना फाशी होईल. सरकार तुमच्या पाठिशी आहे, या शब्दात फडणवीस यांनी त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'माझी मुलगी त्याला काका म्हणत असे'

या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ' त्या परिसरात गवळीची दहशत होती.  घराच्या ठिकाणीच तो नशाखोरांना बसवून गांजा द्यायचा. एकदा माझी मुलगी त्यांच्या घरात गेली असता विशाल गवळीच्या वडिलांनी एक पुडी ग्राहकाला देण्यासाठी माझ्या मुलीला पाठविले होते. 

माझी मुलगी विशालला काका म्हणायची. काही लोकांनी सांगितले की, विशाल वाईट व्यक्ती आहे. म्हणून मी आणि माझ्या पत्नीने मुलीला त्याच्या घरी जायचं नाही, असं बजावलं होतं. तसंच त्याबद्दल तिला मारलं ही होतं. 

Kalyan Marathi Man Attack : अखिलेश शुक्लाच्या अडचणीत वाढ, कोर्टाच्या आवारात झाला वकिलाशी वाद

( नक्की वाचा : Kalyan Marathi Man Attack : अखिलेश शुक्लाच्या अडचणीत वाढ, कोर्टाच्या आवारात झाला वकिलाशी वाद )

हत्यार आणि मुलीचे कपडे हस्तगत

दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस आरोपीला त्याच्या घरी आणि घटनास्थळी घेऊन गेले होते. कल्याण पूर्वेतील मयत मुलीचे कपडे फेकले होते. ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. काही शस्त्रे घरातून हस्तगत केली आहेत. 

राजकारण तापलं

कल्याणमधील या घटनेवर आता  राजकारण सुरु झाले आहे. गवळी भाजपाचाच कार्यकर्ता आहे. भाजपा आमदार त्याला वाचवत असतं, असा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय. भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळलेत. भाजपशी विशाळ गवळीचा काडीमात्र संबंध नाही. महेश गायकवाड आमदार झाले पाहिजेत अशी त्यानं पोस्ट केली होती. तो महेश गायकवाड यांचाच समर्थक आहे, असा आरोप सूर्यवंशीनं केलाय. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com