जाहिरात
This Article is From Aug 29, 2024

टॉयलेटमध्ये घडली होती भयंकर घटना, 15 दिवसांनी पत्नीचं कृत्य उघड, पोलीसही हादरले

पोलिसांकडून वेळेत यावर कारवाई करण्यात आली नसल्याने कुटुंबाकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

टॉयलेटमध्ये घडली होती भयंकर घटना, 15 दिवसांनी पत्नीचं कृत्य उघड, पोलीसही हादरले
नवी दिल्ली:

राजस्थानमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील महिलेने घराच्या टॉयटेलमध्ये भयंकर कृत्य केलं. तिने आपल्या पतीची हत्या केली आणि मृतदेह टॉयलेटमध्ये दफन केला. याबाबत सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, खचवाना गावात राहणारे 42 वर्षीय रूपराम 16 दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी याची दखल घेतली नाही. शेवटी कुटुंबीयांनी स्थानिक आमदाराची मदत घेतली, यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी रूपराम यांच्या पत्नीला पोलिसी खाक्या दाखवला, यानंतर संपूर्ण कहाणी समोर आली. रूपराम यांच्या पत्नीने आपला गुन्हा कबुल केला आहे. 

कुटुंबीयांच्या संशयानंतर घरातील टॉयलेट खोदण्यात आलं. ज्यात रूपराम याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि तपास सुरू केला. याबाबत पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, या प्रकरणात विवाहबाह्य संबंध असल्याचं दिसत आहे. या प्रकरणात मृत रूपरामच्या पत्नीचा राऊंडअप करण्यात आला. 

नक्की वाचा - बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!

गावकरी आणि कुटुंबीयांनी रस्ता अडवला..
या प्रकरणात गावकरी आणि कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. पोलिसांकडून वेळेत यावर कारवाई करण्यात आली नसल्याने कुटुंबाकडून संताप व्यक्त केला जात आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: