जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस होण्याचं स्वप्न, फेरी पूर्ण व्हायला 3 पावलं शिल्लक; धावतानाच तरुणाचा मृत्यू

खाकी वर्दी घालून आपल्या कुटुंबाची गरीबी संपवण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या २३ वर्षीय तरुणाची पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस होण्याचं स्वप्न, फेरी पूर्ण व्हायला 3 पावलं शिल्लक; धावतानाच तरुणाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Police Recruitment : खाकी वर्दी घालून आपल्या कुटुंबाची गरीबी संपवण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या २३ वर्षीय तरुणाची पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १६०० मीटरची फिजिकल टेस्ट सुरू होती. यादरम्यान तरुण अचानक जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मैदानात घडली. या घटनेनंतर भरती प्रक्रियेसाठी आलेल्या हजारो उमेदवारांमध्ये शोक पसरला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्याचा संग्राम धोंडीराम शिंदे पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरला आला होता. शनिवारी सकाळी साधारण ८.१५ वाजता १६०० मीटरची फिजिकल टेस्ट सुरू झाली. संग्रामने उत्साहात धावायला सुरुवात केली. मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो रनिंग लाइनवर पडला. विशेष म्हणजे पहिल्या दोन फेरीत तो पहिला आला होता. 

नक्की वाचा - मंत्र्यांचा मुलगा आरोपी, अन् तपास करणाऱ्या पोलिसाचा आत्महत्येचा इशारा; महाडमध्ये काय घडतंय?

फिजिकल टेस्ट की हृदयाचा आजार? 

संग्राम अत्यंत मेहनती आणि जिद्दी होता. पोलिसात भरती झाल्यावर आपल्या कुटुंबातील दारिद्र्य त्याला दूर करायचं होतं. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उडून तो सराव करीत होता. मात्र नशिबाला हे मान्य नव्हतं. संग्रामच्या अचानक झालेल्या निधनाने शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र ही घटना हार्टअटॅकमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्याप या प्रकरणातील अधिकृत माहिती कळू शकलेली नाही. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच संग्रामला नेमकं काय झालं होतं, हे लक्षात येईल. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com