निवडणुकीदरम्यान 'डीप फेक'सारख्या गैरप्रकारांचा धोका, प्रशासन कडक कारवाईसाठी सज्ज

गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडीओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी डीप फेक व्हिडीओ, क्लिप्स, फोटो किंवा इतर कंटेटचा वापर केला जात असल्याने अनेक प्रकार समोर आले आहेत. या माध्यमातून मतदारांमध्ये खोट्या प्रचाराचा प्रयत्न होत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गैरवापर करून डीप फेक व्हिडीओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. 

(नक्की वाचा- 'महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा हात, मला लटकवण्याचा प्रयत्न')

असे गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडीओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक' कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

(नक्की वाचा - बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार?)

अशा गैरप्रकारांवर त्वरित नियंत्रण मिळवणे तसेच त्वरित कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने, अशा घटनांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानेही चुकीची माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत.

Advertisement