Pune Municipal Corporation Election 2026: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या नावाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांनी शनिवारी म्हणजेच 10 जानेवारी 2026 रोजी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने 'हमीपत्र' असे नाव दिले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
नक्की वाचा: 'लाडकी बहीण योजने'ला मागे टाकणार? पुणेकरांना मेट्रो-बस प्रवास मोफत, NCP जाहीरनाम्यातील गेमचेंजर आश्वासनं
'चिल्लर' टीका
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर सडकून टीका केली. लांडगे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, "महेश लांडगे मोठा नेता आहे. मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. आपल्या मुलांना गडी माणसाला...अहो या बसा, पाणी आणून देता का ? असं बोलतो का ? आपण ए पाणी दे असंच म्हणतो ना ? तो मोठा असल्याने त्याला अजित पवार चिल्लर वाटतो."
नक्की वाचा: Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3?
लांडगे-पवार संघर्ष का सुरू झाला?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रचारासाठी अजित पवारांनी या दोन शहरात पूर्ण ताकद लावली आहे. ते स्वत: पुण्यात ठाण मांडून बसले असून सकाळपासून रात्री प्रचाराची मुदत संपेपर्यंत ते प्रचार करताना दिसत आहे. एका प्रचारसभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी महेश लांडगे यांचे नाव न घेता म्हटले की,"मी ज्यांना ताकद दिली, ती लोकं मला सोडून गेली. त्यांच्या मुलांवर काय आरोप होते, दादागिरी करता गुंडगिरी करतात. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे विसरू नका. मी आरेला कारे करणारा आहे. कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही." भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांचे नाव न घेता टीका करताना म्हटले होते की, " ते म्हणाले की, मी ठरवलं तर कार्यक्रमच करतो. तू कार्यक्रम करतो मग आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का ? आमच्या रणरागिणी लाडक्या बहिणीच तुझा कार्यक्रम करतील. "