जाहिरात

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची निवडणुकीसाठी भूमिका जाहीर, ठाकरेंची अडचण वाढणार?

Muslim Personal Law Board  : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं आगामी विधानसभा निवडणुकीतील त्यांची भूमिका जाहीर केली आहे. या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंची अडचण वाढणार आहे.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची निवडणुकीसाठी भूमिका जाहीर, ठाकरेंची अडचण वाढणार?
मुंबई:

Muslim Personal Law Board  : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर युती करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं आगामी विधानसभा निवडणुकीतील त्यांची भूमिका जाहीर केली आहे. मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी ही भूमिका जाहीर केली. त्यांनी महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. 

महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसह अपक्ष उमेदवारांना नोमानी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. नोमानी यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्यासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. पण, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगे यांनी घुमजाव केलं. त्यानंतर मुस्लीम-मराठा-दलित आघाडी तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड 169 मराठा आणि ओबीसी 53 एससी-एसटी, 23 मुस्लिम आणि 40 अन्य समुदायाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. राज्य विधानसभेच्या 288 पैकी 269 मतदारसंघात त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. तर उर्वरित 19 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसह अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलाय. 

कोण आहेत नोमानी?

सज्जाद नोमानी हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. ते इस्लामसंदर्भात भाषणेही देत असतात. अनेकदा नोमानी हे आपली राजकीय भूमिका ठळकपणे मांडताना दिसतात.  यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नोमानी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी सगळ्या धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येत लोकशाहीविरोधी शक्तींचा मुकाबला करावा असे आवाहन केले होते. 

नोमानी यांनी रामायणासंदर्भात बोलत असताना बुरख्याचे महत्त्व सांगताना रामायणाचा संदर्भ सांगत ते पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे बराच वाद झाला होता. नोमानी यांनी म्हटले होते की भारतामध्ये मुलींना हिजाब घालण्यापासून रोखले जाते. संपूर्ण जगाला हिजाब घालणे हे भारतानेच शिकवले असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 

जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास

( नक्की वाचा :   जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास )

रामायणाचा उल्लेख करत नोमानी यांनी म्हटले होते की लक्ष्मण हे सीतामातेसोबत 14 वर्ष वनवासात होते, मात्र तरीही ते सीतेचा चेहरा पाहू शकले नाही, कारण सीता ही पडद्याआड असायची आणि ती कायम चेहरा झाकून ठेवायची.


ठाकरेंची अडचण का?

नोमानी यांच्या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं महाविकास आघाडीच्या बहुसंख्य उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मविआमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन प्रमुख पक्ष आहेत. 

उद्धव ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीत गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा केल्याचा तसंच हिंदुत्ववादी भूमिकेला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप केला होता. त्यातच मुस्लीमांच्या कट्टरतावादी संघटनेनं त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रामायणाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे नोमानी यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंवर या विषयावर टीका करणाऱ्यांना आयता मुद्दा िमळणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com