जाहिरात

मुस्लीम समाज आणि जमातीत धुसफूस; अंबरनाथमधील 'त्या' उमेदवाराला समाजाचा कडाडून विरोध 

या भूमिकेमुळे अंबरनाथमध्ये महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुस्लीम समाज आणि जमातीत धुसफूस; अंबरनाथमधील 'त्या' उमेदवाराला समाजाचा कडाडून विरोध 
अंबरनाथ:

विधानसभा निवडणुकीला (Assembly Election 2024) अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदा दोन आघाड्या आणि सहा पक्ष रिंगणात असल्यामुळे मतविभाजनाची भीती निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी उमेदवारांकडून  मतदारसंघातील विविध समाजाच्या संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान अंबरनाथमधून (Ambernath News) मोठी बातमी समोर आली आहे. 

Vote Jihad ला व्होट धर्मयुद्धानं उत्तर द्या, PM मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीसांचं आवाहन

नक्की वाचा - Vote Jihad ला व्होट धर्मयुद्धानं उत्तर द्या, PM मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीसांचं आवाहन

अंबरनाथमधील मुस्लीम समाजाने महायुतीला कडाडून विरोध केलाय. तसंच महायुतीच्या उमेदवाराला समर्थन देणारी मुस्लीम जमातीची 11 जणांची कमिटी म्हणजे संपूर्ण मुस्लीम समाज नव्हे, असं म्हणत आमच्यावर महायुतीला समर्थन देण्यासाठी जबरदस्ती कराल, तर समाज उद्या तुमच्यावरच बहिष्कार घालेल, असं म्हणत मुस्लीम समाजाने थेट त्यांच्याच कमिटीला इशारा दिला आहे.

मुस्लीम समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुस्लीम जमातच्या कमिटीने दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुस्लीम जमातचा महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र यानंतर अंबरनाथ शहरातील मुस्लीम समाजात तीव्र नाराजीची लाट पसरली आहे. अंबरनाथ शहरात जवळपास 70 हजार मुस्लीम वास्तव्याला असून त्यांचं प्रतिनिधित्व करणारी 11 जणांची कमिटी म्हणजे संपूर्ण मुस्लीम समाज नव्हे, अशा शब्दात मुस्लीम समाजातील प्रमुख व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच जो सर्वांचा विचार करेल, सर्वांना घेऊन चालेल, अशा सेक्युलर उमेदवाराला निवडून आणणार असून त्यामुळे महाविकास आघाडीचे राजेश वानखेडे यांना समाज मतदान करेल, अशीही भूमिका मुस्लीम समाजाने घेतली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तर मुस्लीम जमातीच्या कमिटीने जर आमच्यावर महायुतीला समर्थन देण्यासाठी जबरदस्ती केली तर उद्या समाज त्यांच्यावरच बहिष्कार घालेल, असा इशाराही मुस्लीम समाजाने दिला आहे. आमचा स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना विरोध नसून त्यांचा पक्ष ज्या भाजपासोबत युतीत आहे, त्यांची मुस्लीम समाजाबाबत जी भूमिका आहे त्याला आमचा विरोध आहे, असं मुस्लीम समाजाने म्हटलं आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com