मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अणूशक्तीनगर विधानसभा मतदार संघात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर नाव न घेता हल्लाबोल केला. हे राष्ट्रवादी दिसत असले तरी ते राष्ट्रवादी नाहीत. जे लोक देशा बाहेरून येणाऱ्या लोकांना थारा देत आहेत. ते लोक राष्ट्रवादी असूच शकत नाही असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. अणूशक्तीनगर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सना मलिक तर शरद पवार गटाचे फहाद अहमद रिंगणात आहेत. तर मनसेचे नवीन आचार्य हे निवडणूक लढत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांनी सभेच्या सुरूवातीलाच अणूशक्तीनगर वाचवायचे असेल तर ही निवडणूक महत्वाची आहे असं सांगितलं. दोन तीन धोके पुढे आहेत ते सांगण्यासाठी मी इथं आलो आहे असं राज म्हणाले. जे दोन उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्या. त्यांचे हेतू आणि उद्देश लक्षात घ्या. मराठी मुसलमान हे प्रामाणिक आहेत. पण काही जण बाहेरच्या देशातून येणाऱ्या मुस्लीमांना सुरक्षा देत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री येती घरी, खड्डे भरणीचा मुहूर्त ठरी!; अंबरनाथकरांमध्ये रंगली चर्चा
ते अशा मुस्लीमांची काळजी घेतील. त्यातून त्यांची मतं वाढवण्याचा त्यांचा डाव आहे. जे दोन उमेदवार आहेत त्यांच्याकडे साधे पणाने पाहू नका. राष्ट्रवादीच्या सना मलिक आणि शरद पवार गटाचे फहाद अहमद यांच्या बद्दल राज बोलत होते. मात्र त्यांनी या दोघांची नावं घेतली नाहीत. हे बाहेरून आलेल्या मुस्लीमाना आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटींग कार्ड काढण्यास मदत करतील. ते लोक इथे जमले तर मग कोणीच काही करू शकणार नाही त्यामुळे सावध रहा असे राज म्हणाले.
बांगलादेश, म्यानमार मधून अनेक मुस्लीम येत आहेत. ही माणसं अशीच घुसत राहीली तर अणूशक्तीनगर चेंबूर हा भाग बर्बाद झाला समजा. इथं भाभा अणू संशोधन केंद्र आहे. जगात काय सुरू आहे हे तुम्हालाही माहित आहेत. त्यामुळे बेसावध राहीलो तर संपलो असं राज म्हणाले. त्यामुळे अणूशक्तीनगरची ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही या दोघांना थारा देणार आहात का असा प्रश्न राज यांनी केला. आपला माणूस हा नवीन आहे. पण तो तुमचा आहे. त्याल विजयी करा असं आवाहन ही राज यांनी केले.
1993 साली मुंबईत स्फोट झाले होते. ते कोणी केले. ते इथल्याच लोकांनी केले होते. जी माणसं आपली म्हणत होतो त्यांनीच आपल्या माणसांना मारलं होतं. याची आठवण राज यांनी करून दिली. ते स्वताच्या धर्माच्या पलिकडे पहात नाही. अशी माणसं ही कोणाचीच नसतात. बांगलादेश, पाकिस्तानच्या लोकांना ते आपलं मानतात. ते आपल्याला आपलं समजत नाहीत. इथं उभे असलेले दोघे ही आपल्याला राष्ट्रवादी म्हणवतात. पण यांचे धंदे काय आहेत. बाहेरच्या लोकांना हे आपलं म्हणतात. अशी माणसं राष्ट्रवादी असूच शकत नाहीत असं ही ते म्हणाले.