मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Viral Video) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संतापलेल्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तर शिंदे ज्या कार्यकर्त्यांमुळे संतापले त्या कार्यकर्त्यांचा आज ठाकरे गटात जाहीर प्रवेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी एक काँग्रेस उमेदवाराने प्रचारासाठी रस्त्यावरुन जात असताना शेजारील भाजपच्या कार्यालयात जाऊन भेटीगाठी घेतल्या होत्या. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता एकनाथ शिंदेंनी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याचं दिसतंय.
नक्की वाचा - एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल; आचारसंहिता भंग केल्याचं प्रकरण
नेमकं काय घडलं?
मुंबईतील चांदिवली परिसरातून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. याचवेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. पण ही घोषणाबाजी सुरू असतानाच एक शब्द शिंदेंच्या कानावर पडला आणि त्यांच्या रागाचा पारा चढला. हे कार्यकर्ते गद्दार गद्दार म्हणून ओरडत होते. मग मागचा पुढचा कसलाही विचार न करता मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली. गाडीतून उतरून एकनाथ शिंदे थेट काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. मुख्यमंत्र्यांचा हाच रौद्रावतार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
संतोष कटकेंची चर्चा...
एकनाथ शिंदेंचा ताफा जात असताना गद्दार गद्दार अशा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव संतोष कटके आहे. मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करणारे संतोष कटकेदेखील चांगलेच चर्चेत आले आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनी संतोष कटकेंचं कौतुक केलं आणि ठाकरे गटात प्रवेश करून घेतला..काल कोण होतं शाखेत त्यांनी समोर या'. त्यावर कार्यकर्त्यांनी संतोष कटकेला पुढे केले आणि म्हटले, 'हा होता ज्याने त्यांना 'गद्दार' म्हटलं'. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'शाब्बास!!! हा फोटो मुद्दामून द्या... त्यांच्यापर्यंत जाऊ द्या'.
दरम्यान या सर्व घटनेवर शिंदे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आगपाखड करणाऱ्या शिंदेंवर निशाणा साधलाय. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. मात्र थेट मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणं हे दुर्मिळच.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world