सध्या विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) जोरदारं वारं वाहत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सभा आणि रॅलींचं आयोजन करण्यात आलं आहे. अगदी पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रात सभांवर सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो वा राहुल गांधी... विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने पक्षांचे स्टार प्रचारक न थकता.. न थांबता प्रचार करीत आहे. अटीतटीची ठरणारी ही निवडणूक पक्षांच्या प्रतिष्ठेवर आली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही अनेक सभा सुरू आहेत. मात्र त्यांच्या अंबरनाथमधील सभा चर्चेचा विषय ठरला आहे.
नक्की वाचा - 'गद्दार गद्दार'च्या घोषणा, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला अन् थेट गाठलं काँग्रेस कार्यालय; पुढे काय घडलं?
अंबरनाथ-बदलापूरमधील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रेल्वेत तुडूंब गर्दी असतानाही रस्त्याने प्रवास करणं केवळ या खड्ड्यांमुळे कठीण झालं आहे. खड्डे, मोठमोठे स्पीड ब्रेकर यामुळे रस्ते वाहतुकीचा वापर करणाऱ्या नागरिक हाडं अक्षरश: खिळखिळी होत आहे. मात्र पालिकेचं याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आहे. या सभेची तयारी एकीकडे जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून पालिकेने चक्क खड्डे भरायचा कार्यक्रम सुरू केला आहे. पावसाळ्याच्या आधीपासून अंबरनाथ शहरातल्या काही रस्त्यांवर खड्डे मोठमोठे पडले होते. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. पत्रकारांनी अनेक बातम्याही केल्या. मात्र पालिकेनं कसलीही दखल घेतली नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याचं समजताच पालिकेनं तातडीनं 'खड्डेबोल' सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या येण्यामुळे जर खड्डे बुजणार असतील, तर मुख्यमंत्र्यांनी महिन्याला एखादी चक्कर अंबरनाथला नक्की मारावी, अशी चर्चा अंबरनाथकरांमध्ये रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world