दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर पडताच केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर मोर्चाच उघडला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आक्रमकपणामुळे भाजप दिल्लीत काहीशी बॅकफूटवर आल्याचं दिसून येत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका वक्तव्याची देशभर चर्चा सुरु आहे. केजरीवाल यांच्या या वक्तव्याची भाजपने देखील धास्ती घेतली आहे. नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी 75 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे त्यांनी बनवलेल्या नियमानुसार 75 वर्षांनंतर ते निवृत्त होतील. यानुसार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि सुमित्रा महाजन यांना निवृत्त केलं गेलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येत्या 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहे. त्यानंतर अमित शाह पंतप्रधान बनतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं.
(नक्की वाचा -'मोदी गॅरंटी'ला 'केजरीवाल गॅरंटी'चं आव्हान; अरविंद केजरीवाल यांची 10 मोठी आश्वासने)
अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर अमित शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण देत, नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असं म्हटलं. भाजपच्या संविधानात असं काही लिहिलेलं नाही. अमित शाह यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली असली तरी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ आहेत, त्यावर एक नजर टाकुया.
1. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आज देशातच नाही तर परदेशातही आहे. त्यांचा मानणारा मोठा वर्ग देशात आहे. सध्याच्या घडीला मोदींच्या नावाने लोक भाजपला मतदान करतात. भाजपपासून अनेकवर्ष दूर असलेल्या लोकांना मोदींना जवळ केलं आहे. केजरीवाल यांनी या लोकांपर्यत आपला संदेश पोहोचवला आहे.
(नक्की वाचा - अधिकृत विरुद्ध बंडखोर! जळगावमध्ये भाजप समोर बंडखोर भाजप उमेदवाराचेच आव्हान)
2. भाजपचे विविध राज्यांमध्ये अनेक मोठे नेते आहेत, त्यांना पक्षाने मुख्यमंत्रिपदासारख्या प्रमुख पदावरुन दूर केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली या नेत्यांनी एवढा मोठा निर्णय मान्य देखील केला आहे. मात्र नरेंद्र मोदींव्यतिरिक्त इतर कोणत्या नेत्याचा स्वीकार हे नेते करतील की नाही याबाबत शंका आहे. अरविंद केजरीवाल यांनी असं वक्तव्य करुन शांत असलेल्या या नेत्यांचा असंतोष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.
3. अरविंद केजरीवाल यांना आपल्या वक्तव्यातून अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. भाजपमधील इतर बड्या नेत्यांना 75 वर्षांनंतर निवृत्तीचा निर्णय लागू होतो, मग तो नरेंद्र मोदी यांना का लागू होत नाही? या चर्चेला देखील वाव दिला आहे.
(नक्की वाचा - पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात होणार खडाजंगी? आमने-सामने मुकाबल्यासाठी काँग्रेस तयार)
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झाल्यानंतर खरंच निवृत्त होतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जनतेमध्ये असा संदेश गेल्यास मोदींच्या भाजपला मतदान करणारे मतदार मतदानासाठी बाहेर पडतील का? तसेच यातून संभ्रमाची स्थिती निर्माण झाली तर याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांमध्ये एक स्पष्ट संदेश पोहोचवला आहे की नरेंद्र मोदींच्या नावाने मतदान करणाऱ्यांना पुन्हा एकदा विचार केला पाहीजे. तुम्ही नरेंद्र मोदींना मतदान कराल, पण ते निवृत्त झाले तर काय? या असा संभ्रम अरविंद केजरीवाल यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.