सोलापूर लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे ला मतदान झाले. या मतदार संघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपकडून राम सातपूते मैदानात आहेत. इथलं मतदान झालं आहे. त्यानंतर कार्यकर्ते कोण जिंकणार याचे अंदाज बांधत आहेत. शिवाय प्रत्येक बुथ वरून आढावाही घेतला जातोय. त्यावरून कोणाला किती मत मिळतील, शिवाय विजयाचे आणि पराभवाचे अंदाजही बांधले जात आहे. अशात राजकीय पक्षाचे पुढारी पैजा लावतानाही दिसत आहे. सोलापूरातही तसचं काही घडलं आहे. इथे मनसे नेत्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याबरोबर सोलापुरमध्ये कोण जिंकेल यावर पैज लावली आहे.
पैज काय लावली?
प्रशांत इंगळे हे मनसेचे सोलापूरचे अध्यक्ष आहेत. तर प्रशांत बाबर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आता या दोन नेत्यांमध्ये पैज लागली आहे. पैज अशी आहे की सोलापूरमधून कोण जिंकणार? मनसेच्या इंगळे यांनी सोलापुरातून महायुतीचे राम सातपूते हे पन्नास ते साठ हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला आहे. शिवाय पैज ही लागवी आहे. जर सातपूते विजयी झाले तर ते राष्ट्रवादीच्या प्रशांत बाबर यांनी एक लाख एक रूपये देतील. इंगळे यांनी लावलेही ही पैज बाबर यांनी स्विकारली आहे. पैजेचा एक हजार रूपयांचा विडाही त्यांनी उचलला आहे.
बाबर यांचा दावा काय?
सोलापूर लोकसभेत महाआघाडीसाठी चांगेल वातावरण असल्याचे बाबर म्हणाले. शिवाय मतदान झाल्यानंतर बुथ नुसार फिडबॅक घेतला गेला. त्यानुसार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले. शिवाय शरद पवारांनी प्रणिती यांच्यासाठी केलेला प्रचार हा जमेची बाजू असल्याचेही ते म्हणाले. सोलापूरात विकास झालेला नाही. रोजगाराच्या संधी नाहीत. मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांनाच बरोबर घेतले. त्यामुळे सोलापुरातील जनता नाराज आहे. त्याच बरोबर राम सातपूते हे थोपलेले उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपचे दोन आमदार नाराज होते. ते प्रचारातही दिसले नाहीत. त्यामुळेच प्रणिती यांचे पारडे जड असल्याचे त्यांनी सांगितले.
इंगळे यांनी मांडले विजयाचे गणित
प्रशांत इंगळे यांनी सोलापुरातील जनता रामाच्या मागे आहेत. शिवाय त्यांना मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे सोलापुरातून राम सातपूतेच विजयी होतील. त्यांचा विजय हा पन्नास ते साठ हजाराच्या फरकाने होईल. त्यावर पडलेली मते ही बोनस असतील असे ही ते म्हणाले. याची आपण पैज लावली आहे. तसा बाबर यांना एक हजाराचा पैजेचा विडा ही देऊन आल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय निकालाच्या दिवशी आता त्यांच्याकडून एक लाख घेऊनच येणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world