सोलापूर लोकसभेसाठी 7 मे ला मतदार होत आहे. तर आज ( रविवार ) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. त्यात काही थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. तर काही जण सोशल मीडियावर अधिक जोर देत आहेत. प्रचार सभा, रोड शो त्यात आलेच. पण एका उमेदवाराने भन्नाट शक्कल लढवत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्याचे नाव सचिन म्हस्के आहे. सचिन हे अपक्ष म्हणून सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी एक बॅनर शहरात लावला आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्यांच्याकडे गेले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्या बॅनरमध्ये नक्की काय?
लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. सोलापुरचा विकास आपण करू शकतो अशी हमी दिली जात आहे. त्यामुळे मतदान आम्हालाच करा असे सांगितले जात आहे. या सर्व गोंधळात एक सोलापुरात लागलेला एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी हा बॅनर लावला आहे. त्यात "वडिलांनी मागच्या 40 वर्षात काहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार? "असा मजकूर या बॅनरवर लिहीण्यात आला आहे.
हेही वाचा - तिसऱ्या टप्प्यातील मतदान, प्रचार आज थंडावणार
शिंदे विरूद्ध सातपूते थेट लढत
सोलापूर लोकसभेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरूद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात थेट लढत होत आहे. शिंदे आणि सातपूते यांनी अतिशय आक्रमक पणे प्रचार केला आहे. दोन्ही उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहे. त्यात वंचितच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत प्रणिती शिंदेंना समर्थन दिले होते. वंचितने मग अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ केला. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सभाही घेतली. त्यावेळी त्यांनी शिंदे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते.
हेही वाचा - तमिळनाडू हादरले! बेपत्ता काँग्रेस नेत्याचा जळालेला मृतदेह सापडला
7 मे ला होणार मतदान
सोलापूर लोकसभेसाठी 7 मेला मतदान होणार आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. सोलापूर लोकसभेत प्रचारासाठी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. तर देवेंद्र फडणवीसांनी राम शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world