केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (BJP Manifesto 2024) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपचा संकल्पपत्र जारी केला आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि पक्षाचे अन्य नेता उपस्थित होते. यावेळी अमित शाहांनी संविधानाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना घेराव घातला. याशिवाय चर्चेत असलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचं स्पष्टीकरण दिलं.
यावेळी अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना काही प्रश्नही विचारले. ते म्हणाले, राहुल गांधींनी वीर सावकरकांविषयी दोन चांगले शब्द बोलावे हे ते उद्धव ठाकरेंना सांगू शकतात का? काँग्रेसचा कोणताही नेता बाळासाहेब ठाकरेंच्या सन्मानार्थ दोन वाक्य बोलू शकतो का? अंतर्विरोधात आघाडी सरकार स्थापन करण्याचं स्वप्न घेऊन निघालेल्यांना महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलं तर चांगलं राहील.
नक्की वाचा - MVA Manifesto 2024 : मविआने जाहीर केला पंचसूत्री कार्यक्रम; 'महाराष्ट्रनामा'मधील महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?
याशिवाय 'बटेंगे तो कटेंगे'या घोषणेबद्दलही अमित शाहांनी स्पष्टीकरण दिलं. याबाबत ते म्हणाले, काँग्रेस पक्ष विविध प्रकारे जातींचा मुद्दा उचलून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. आदिवासी एक समाज म्हणून त्यांची मोठी ताकद आहे. मात्र आदिवासी जातींमध्ये विभागले गेले तर त्यांची ताकद क्षीण होईल. त्यातून कटेंगे तो बटेंगे हा मुद्दा समोर आला.
भाजपच्या संकल्पपत्रातील प्रमुख आश्वासने?
1. लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार 2,100 रुपये म्हणजेच वर्षाला 25,200 देणार
2. शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी शेतकरी सन्मान निधीत वाढ 12.000 रुपये ऐवजी 15,000 रुपये मिळणार आणि MSP वर 20 टक्के अनुदान देणार
3. प्रत्येक गरीबाचं स्वप्न पूर्ण होईल, भाजप-महायुती अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल
4. वृद्ध पेरशन धारकांचा सन्मान, महिन्याला 2100 रुपये म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये देणार
5. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार
6. 10 लाख विद्याथ्यांना मिळणार 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती करणार
7. ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा 45,000 गावांत पांदण रस्त्यांची बांधणी होणार
8. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 वेतन आणि विमा संरक्षण मिळणार
9. वीज बिलात 30 टक्के कपात होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
10. सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत 'व्हिजन महाराष्ट्र @2028' सादर करण्यात येईल
11. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य भाजप साकार करणार
12. मेक इन महाराष्ट्र बनवेल राज्याला फिनटेक आणि AI ची राजधानी नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरे बनणार एयरोस्पेस हब
13. खांवरील SGST कर मिळणार परत सोयबिनला प्रति क्विंटल किमान 6000 रुपये भाव देणार
14. 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार. 500 बचतगटांसाठी 1000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध होणार.
15. अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्य देणार
16. महारथी आणि अटल टिंकरिंग लॅब्स योजनेतून सर्व शासकीय शाळांमध्ये रोचोटिक्स आणि AI चे प्रशिक्षणाची संधी होईल उपलब्ध
17. महाराष्ट्रात होणार कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणार
18. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून घडवणार 10 लाख उद्योजक
19. एससी, एसटी, ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
20. ओबीसी, एसबीसरी, इडब्लूएस आणि वीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार
21. युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणिवार्षिक आरोग्य तपासणी
22. महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन
23. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण आधार-सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ओपीडी
24. सक्तीच्या धर्मातरणाविरोधात कायदा करणार. फसव्या धर्मांतराला आळा बसणार
25. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानव-वनाऔव संघर्ष टाळणार तसेच वन्यप्राण्यांपासून होणारी जीवितहानी रोखणार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world