जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

श्रीकांत शिंदेंचं टेन्शन वाढलं; भाजप आमदाराच्या पत्नी मविआ उमेदवाराच्या प्रचारात

एका सार्वजनिक कार्यक्रमात वैशाली दरेकर यांच्यासोबत आज पुन्हा एकदा भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या दिसून आल्या.

श्रीकांत शिंदेंचं टेन्शन वाढलं; भाजप आमदाराच्या पत्नी मविआ उमेदवाराच्या प्रचारात

कल्याणमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण होत आलं आहे. मात्र अद्यापही कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी प्रचार देखील सुरु केला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात वैशाली दरेकर यांच्यासोबत आज पुन्हा एकदा भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या दिसून आल्या. त्यामुळे कल्याणमध्ये महायुतीत संभ्रमाचं वातावरण आहे. 

अंबरनाथमधील गोरपे गावात मंदिराची प्रतिष्ठापना होती. त्यानिमित्त संजय राऊत आले होते. संजय राऊत, वैशाली दरेकर यांच्यासह स्वागत मिरवणुकीत भाजप आमदार गणपत गाकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सहभागी झाल्या होत्या. याआधी गुढी पाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत देखील सुलभा गायकवाड आणि वैशाली दरेकर एकत्र आल्या होत्या. दोघींनी गळाभेट घेऊन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर आमदार गायकवाड गटाकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं होतं. शुभेच्छा कोणीही कोणाला देऊ शकतं, असं आमदार गायकवाड गटाने म्हटलं होतं. 

शरद पवारांचा लोकसभा जिंकण्याचा 'सुपर 50' प्लॅन, कसे असतील पुढचे 22 दिवस?

गायकवाड आणि शिंदे गटातील वाद

शिवसेना पदाधिकारी महेश शिंदे आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यातील वाद अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन्ही नेत्यांमधील जमिनीच्या वादावरुन गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. 

मात्र गणपत गायकवाड यांच्या पत्नी आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. याआधी गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांचे काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच कल्याण लोकसभेतून भाजपला उमेदवारी द्यावी, असा ठरावही केला होता. मात्र भाजपच्या बड्या नेत्यांनी मध्यस्थी करत वाद संपल्याचा दावा केला होता.

मात्र आज पुन्हा एकदा सुलभा गायकवाड या संजय राऊत यांच्या स्वागत मिरवणुकीत सहभागी झाल्याने कल्याण पूर्वेतील शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद संपुष्टात आला नसल्याचं अधोरेखित झालं आहे. याचा फटका महायुतीला बसण्याची दाट शक्यता आहे. 

विजयाची निश्चिती असो की नेत्यांची नाराजी, महायुतीची सर्व मदार फडणवीसांवरच

गायकवाड यांना युतीधर्म पाळावा लागेल

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत म्हटलं की, या संदर्भात अद्याप तरी आम्हाला काही माहीती नाही. मात्र जर असे झाले असेल तर आम्ही बसून गायकवाड यांची पुन्हा समजूत काढू. त्यांना महायुतीचा धर्म पाळावाच लागेल, असंही आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com