विधानसभा निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि आघाडीत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या बंडखोरांनी शेवटपर्यंत शांत करण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत. त्यात भिवंडी ग्रामिण विधानसभा मतदार संघात भाजपला बंडखोरी शमवण्यात यश आलं आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारानं सुटकेचा निश्वास टाकला आहे. शिंदे गटाने इथे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना उमेदवारी दिली आहे. इथे भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली होती. आता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत महायुतीला पाठींबा जाहीर केला आहे. स्नेहा पाटील या माजी मंत्री कपिल पाटील यांच्या समर्थक समजल्या जातात.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. हा मतदार संघ महायुतीत भाजपला मिळावा असा आग्रह होता. पण तसे झाले नाही. शेवटी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समर्थक असलेल्या स्नेहा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.तेव्हापासूनच या मतदारसंघातील समीकरण बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत स्नेहा पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांच्या अडचणीत वाढ झालेली होती.
ट्रेंडिंग बातमी - 'चला आपण एकत्र येवू', भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साद, नेमकं काय घडलं?
मात्र कपील पाटील यांनी यात आता मध्यस्थी केली आहे. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत स्नेहा पाटील यांनी महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. स्नेहा पाटील यांची समजूत काढण्यात पाटील यांना यश आलं आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुती पुन्हा सत्तेमध्ये येणे गरजेचे आहे. त्यासाठी भिवंडी ग्रामीण मधील महायुतीचा आमदार विजयी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच स्नेहा पाटील आणि सर्व भाजपाच्या समर्थकांची समजूत काढल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं. सर्वांनी महायुती सोबत एकनिष्ठ राहण्या बाबत सूचना दिल्याचंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'उद्धवजी तुम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?' आठवलेंचा ठाकरेंना सवाल काय?
या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे हे मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाने महादेव घटाल यांना उमेदवारी दिली आहे. शिवाय मनसेचा उमेदवारही मैदानात आहे. श्रमजीवीचा उमेदवारही निवडणूक लढत आहे. त्यामुळे इथे तिरंगी लढ होत आहे. ही जागा एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यात भाजपने बंडखोरी केल्याने त्यांची डोकेदुखी वाढली होती. पण आता त्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने शिंदेंना मात्र दिलासा मिळाला आहे. त्यामुळे इथे आता थेट लढत पाहायला मिळणार आहे.