जाहिरात

Pune News : पुण्याचा चेहरामोहरा बदलणार; प्रामाणिक पुणेकरांना मोठी भेट; संकल्पपत्रात भाजपच्या मोठ्या घोषणा

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील पुण्याचा हिस्सा चार पटीने वाढवून २७० अब्ज डॉलरवर नेण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं.

Pune News : पुण्याचा चेहरामोहरा बदलणार; प्रामाणिक पुणेकरांना मोठी भेट; संकल्पपत्रात भाजपच्या मोठ्या घोषणा

BJP's manifesto for Pune : ठाकरे बंधूंनी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेसाठी वचननामा जाहीर केला. त्यानंतर आता भाजपने पुण्यासाठीचं संकल्पपत्र जाहीर केलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा 'विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र' जाहीरनामा प्रसिद्ध झालं आहे. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुणे शहरातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील पुण्याचा हिस्सा चार पटीने वाढवून २७० अब्ज डॉलरवर नेण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०३० पर्यंतचा पुण्याचा ‘कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन' तयार असून याअंतर्गत पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४४,००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं या संकल्पपत्रात म्हटलं आहे. 

BMC Election 2026: देवेंद्र फडणवीसांनी वरळीत गेम फिरवला, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

नक्की वाचा - BMC Election 2026: देवेंद्र फडणवीसांनी वरळीत गेम फिरवला, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा...

  • पाचरी चौकात फुटपाथ कमी करणार.
  • अतिक्रमण आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना मालमत्ता कर माफ करणार.
  • महिलांना सवलतीच्या दरात मेट्रो व ‘पीएमपीएमएल' बससेवा उपलब्ध करून देणार.
  • ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत ‘पीएमपीएमएल' प्रवास उपलब्ध करून देणार.
  • प्रामाणिक पुणेकर नागरिकांना ४० टक्के कर सवलत पुढील पाच वर्षे सुरू ठेवणार.
  • वय वर्षे ३० पुढील प्रत्येक पुणेकराची वार्षिक आरोग्य तपासणी मोफत करणार.
  • वारसा स्थळांभोवती असणाऱ्या बांधकामांचा प्रश्न सोडविणार.
  • मेट्रोसाठी शहरभर लास्ट माईल कनेक्टिव्हिटी तयार करणार.
  • नद्याने समाविष्ट गावांमधील रस्ते, पाणी, मलनिस्सारण इत्यादी सुविधांची पूर्तता होईपर्यंत याचना मिळकत करात सवलत देणार.
  • वस्ती भागात ३०० लोकसंख्येमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह देणार.
  • पुणे शहरास ‘वर्ल्ड बुक कॅपिटल' बनविण्यासाठी प्रयत्न करणार.
  • ‘भारत मंडपम'च्या धर्तीवर पुण्यात अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणार.
  • पुण्यात ‘एम्स' रुग्णालय आणण्यासाठी प्रयत्न करणार.
  • खडकवासला ते खराडी या नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार पुणे विमानतळापर्यंत करणार.
  • पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर डेटा सेंटर विकसित करणार.
  • शहरातील रस्त्यांचे आणि चौकांचे विद्युतीकरण करणारे अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई करणार.
  • शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करणार.
  • पुणे विमानतळावर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पुण्यकृती पुतळा उभारणार.
  • पुणे शहर व परिसरातील जांभूळवाडी, कात्रज, पाषाण आणि लोणीकाळभोर तलावांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करून पुणे शहराला ‘लेक सिटी' म्हणून विकसित करणार.
  • माण–म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग योजनेचे काम गतीने पूर्ण करणार.
  • शहरातील १५ एकत्रित डीपी योजनांचे काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करणार.
  • ‘विकसित पुणे' हे लक्ष्य ठेवत ‘पुणे ग्रोथ हब'ची निर्मिती करणार.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com