- मुंबई महापालिका निवडणुकीत नव्या आणि पहिल्यांदा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जोरदार विजय मिळवला आहे
- शिवसेना ठाकरे गटाच्या राजेंद्रसिंह रावत यांनी शिंदे गटाच्या दिप्ती वायकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे
- धारावीच्या वॉर्डमध्ये काँग्रेसच्या आशा काळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला आहे
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. या निकालात काही धक्कादायक निकाल लागले आहे. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसले. प्रस्थापितांना एक प्रकारे या निकालातून धक्का बसला आहे. नवख्या आणि पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत विजयाला गवसणी घातली आहे. यात सर्व पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे हे विशेष म्हणावे लागेल. निकाल हाती येत असताना काही दिग्गज आणि जेष्ठ नगरसेवक हे पिछाडीवर असल्याचं ही चित्र पाहायला मिळालं. पण सर्वात जास्त चर्चा ही धक्कादायक निकालाचीच मुंबईत रंगली होती.
शिवसेना ठाकरे गटात असलेले आणि एके काळचे उद्धव ठाकरे यांचे विश्वास समजले जाणारे रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकर या निवडणूक रिंगणात होत्या. त्यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली होती. त्या वार्ड क्रमांक 73 मधून निवडणूक लढवत होता. पण त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या लोना राजेंद्रसिंह रावत यांनी मोठ्या फरकाने पराभवे केला. हा वायकर यांच्यासाठी धक्का समजला जातो. त्यांच्यात बालेकिल्ल्यात त्यांना दुसऱ्यांदा पराभव स्विकारावा लागला आहे. आधी विधानसभेला पत्नीचा पराभव नंतर महापालिकेला मुलीचा पराभव झाला आहे. लोकसभेला ते स्वत: फक्त 48 मतांनी जिंकले होते.
दुसरा धक्कादायत निकाल हा धारावीतून आला आहे. धारावीच्या वॉर्ड क्रमांक 183 मध्ये काँग्रेसच्या आशा काळे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा जवळपास 1450 मतांनी पराभव केला. वैशाली शेवाळे या शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहीनी आहेत. वैशाली शेवाळे या माजी नगरसेविका होत्या. त्यामुळे शेवाळे आणि त्याच बरोबर शिवसेना शिंदे गटासाठई हा धक्का मानला जात आहे. त्याच बरोबर दादरच्या वार्ड क्रमांक 194 वर सर्वांचे लक्ष होते. इथं ही हायव्होल्टेज लढत होती. माजी आमदार सदा सरवणकर यांचा पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना इथून पराभवाचा धक्का बसला आहे.
दादर हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. इथं सरवणकर यांची चांगली ताकद आहे. पण यावेळी ही त्यांनी दादरकरांनी साथ दिली नाही. त्यांच्या मुलाचा पराभव झाला. या ठिकाणी ठाकरे गटाते माजी आमदार सुनिल शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 33 मधली निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली होती. इथं आमदार अस्लम शेख यांची बहीण कमरजा सिद्धिकी निवडणूक रिंगणात होत्या. त्यांनी अपेक्षित पणे या ठिकाणी मोठा विजयी मिळवला आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या 173 वार्डचा निकाल सर्वांना चक्रावून टाकला होता.
नक्की वाचा - BMC Election Result 2026: मुंबईतील 35 जागांचे निकाल लागले, पाहा कोण-कोण जिंकले
हा वार्ड जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला गेला होता. त्यामुळे इथं भाजपकडून शिल्पा केळुसकर यांनी बंडखोरी केली होती. शिवाय त्यांनी अर्ज भरताना भाजपचा ड्युप्लिकेट एबी फॉर्म भरला होता. त्यामुळे हा निवडणूक चर्चेत राहीली होती. वॉर्ड क्रमांक 173 मधून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र भाजप बंडखोर असलेल्या शिल्पा केळुसकर यांनी त्यांना मात देत विजय नोंदवला. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का समजला जात आहे. विद्यमान नगसेवकाला पराभव स्विकारावा लागला. भाजपच माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ही विजय मिळवला आहे. त्यांना या वार्डमध्ये मतविभागणीचा फायदा मिळाला.
प्रभाग क्रमांक 87 मधून शिवसेनेचा माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची पत्नी पूजा विश्वनाथ महाडेश्वर या विजयी झाल्या आहेत. तर सर्वात धक्कादायक आणि आश्चर्यकारक निकाल हा भायखळ्यातून आला आहे. प्रभाग क्रमांक 207 मधून डॉन अरूण गवळी याची मुलगी योगित गवळी ही पराभवाचा धक्का बसला आहे. गवळीच्या वर्चस्वाला या धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाते मिलिंद वैद्य हे विजयी झाले आहेत. तर भाजपा राजन पारकर हे पराभूत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे बंधू कॅप्टन मलिक यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले रवी राजा यांचा पराभव झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world