जाहिरात

Municipal Corporation Elections 2026: एका उत्तरावर ठरणार इच्छुकांचे भवितव्य, प्रश्नांची यादीच आली समोर

Municipal Corporation Elections 2026: महानगरपालिकांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीसाठी (Municipal Elections 2026) सगळ्याच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींना सुरूवात केली आहे.

Municipal Corporation Elections 2026: एका उत्तरावर ठरणार इच्छुकांचे भवितव्य, प्रश्नांची यादीच आली समोर
Maharashtra Municipal Corporation Elections 2026: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधील 2 हजार 869 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
मुंबई:

Municipal Corporation Elections 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे (Municipal Corporation Elections Voting and Counting Date). महानगरपालिकांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीसाठी (Municipal Elections 2026) सगळ्याच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींना सुरूवात केली आहे. राजकीय पक्ष या मुलाखतींद्वारे आपले उमेदवार निश्चित करणार आहेत. या मुलाखतींचा NDTV मराठीने कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्ष या मुलाखतींमध्ये इच्छुकांना काय प्रश्न (Political Party Candidate Questions) विचारत आहेत, याचा तपशील आमच्या प्रतिनिधींनी गोळा केला. यातून कोणते राजकीय पक्ष काय प्रश्न विचारत आहेत हे कळण्यास मदत झाली आहे.   

कोणत्या महानगरपालिकांसाठी होणार आहे निवडणूक? 

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधील 2 हजार 869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. ज्या महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे, त्या महानगरपालिकांची यादी खालीलप्रमाणे आहे. 

  1. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation)
  2. नवी मुंबई (Navi Mumbai Municipal Corporation)
  3. वसई- विरार (Vasai-Virar Municipal Corporation)
  4. कल्याण- डोंबिवली (Kalyan Dombivli Municipal Corporation)
  5. कोल्हापूर (Kolhapur Municipal Corporation)
  6. नागपूर (Nagpur Municipal Corporation)
  7. मुंबई (Mumbai Municipal Corporation)
  8. सोलापूर (Solapur Municipal Corporation)
  9. अमरावती (Amravati Municipal Corporation)
  10. अकोला (Akola Municipal Corporation)
  11. नाशिक (Nashik Municipal Corporation)
  12. पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
  13. पुणे (Pune Municipal Corporation)
  14. उल्हासनगर (Ulhasnagar Municipal Corporation)
  15. ठाणे (Thane Municipal Corporation)
  16. चंद्रपूर (Chandrapur Municipal Corporation)
  17. परभणी (Parbhani Municipal Corporation)
  18. लातूर (Latur Municipal Corporation)
  19. भिवंडी- निजामपूर (Bhiwandi Nizampur Municipal Corporation)
  20. मालेगाव (Malegaon Municipal Corporation)
  21. पनवेल (Panvel Municipal Corporation)
  22. मीरा- भाईंदर (Mira Bhayandar Municipal Corporation)
  23. नांदेड- वाघाळा (Nanded-Waghala Municipal Corporation)
  24. सांगली- मीरज- कुपवाड (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation)
  25. जळगाव (Jalgaon Municipal Corporation)
  26. अहिल्यानगर (Ahilyanagar Municipal Corporation)
  27. धुळे (Dhule Municipal Corporation)
  28. जालना (Jalna Municipal Corporation)
  29. इचलकरंजी (Ichalkaranji Municipal Corporation)

इच्छुकांच्या मुलाखतीत काय प्रश्न विचारले जातात?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून. जवळपास सगळेच राजकीय पक्ष खालील प्रश्न विचारत आहेत.  

  • कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहात. 
  • पक्षाच्या पदावर तुमची निवड झाली आहे? 
  • तुम्ही पक्षात एखादे पद भूषवले आहे का ? 
  • पक्षातील जबाबदारी सर्व जबाबदाऱ्यांची माहिती आहे का? 
  • आतापर्यंत कोणती निवडणूक लढवली आहे का ? 
  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्यावर जबाबदारी होती का ? 
  • आपल्या कार्यक्षेत्रात लोकसभा व विधानसभा उमेदवारास झालेल्या मतदानाचे तपशील
  • प्रभागातील सामाजिक वर्गीकरण 
  • प्रभागातील विरोधी पक्षाचे तुल्यबळ उमेदवार नाव आणि पक्ष 
  • तुम्हाला उमेदवारी का द्यावी?

नागपुरात इच्छुकांना विचारला जातोय पेचात पाडणारा प्रश्न

नागपुरात एकूण 151 जागांसाठी सुमारे 3 हजार लोकांनी भाजपचे अर्ज घेतले. त्यापैकी अर्धे अर्ज म्हणजे दीड हजार अर्ज भरून परत आले. नागपुरात भाजपच्या दीड हजार इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात असून त्या विधानसभा मतदारसंघ निहाय घेतल्या जात आहेत.

नागपूरमध्ये भाजपमधील इच्छुकांना इतर प्रश्नांसोबत इच्छुकांना एक प्रश्न विचारला जात आहे. हा प्रश्न सगळ्या इच्छुकांना पेचात पाडणारा आहे. मुलाखत घेणारे सगळ्या इच्छुकांना प्रश्न विचारत आहेत की, पक्षाने आपल्याला तिकीट दिले नाही तर बंडखोरी कराल काय? 

पुण्यात मनसेने केली इच्छुकांच्या मुलाखतींना सुरूवात

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेच्या इच्छुकांच्या मुलाखतींना 19 डिसेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी सुरूवात झाली. मनसेकडून जवळपास 435 जणांनी अर्ज घेतले होते यापैकी 250 जणांनी अर्ज भरले आहेत. या मुलाखतींचा अहवाल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिला जाणार असून ते कोणाला उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय घेतील असे मनसेच्या नेत्यांनी सांगितले आहे. मनसेने या मुलाखतींसाठी हेमंत संभूस, अजय शिंदे, किशोर शिंदे ,योगेश खैरे,गणेश सातपुते यांची समिती तयार केली आहे. या मुलाखतींना काही उमेदवार हे वाजत गाजत आले होते.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com