जाहिरात
Story ProgressBack

लोकसभेचं तिकीट जाहीर होताच वंचितचे उमेदवार दर्शनासाठी औरंगजेबाच्या कबरीवर!  

वंचितच्या उमेदवाराने कबरीचं दर्शन घेतल्याच्या घटनेनंतर नव्या वादाता तोंड फुटलं आहे. अफसर खान हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि महानगरपालिकेत 20 वर्षे नगरसेवक तसेच विरोधीपक्ष नेते पदावर होते.

Read Time: 2 min
लोकसभेचं तिकीट जाहीर होताच वंचितचे उमेदवार दर्शनासाठी औरंगजेबाच्या कबरीवर!  
छत्रपती संभाजीनगर:

प्रतिनिधी, अन्वर अलमनूर जाफर 

छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात एक मोठी घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अफसर खान यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली आणि दर्शन घेतलं. गेल्या वर्षी प्रकाश आंबेडकरदेखील संभाजीनगर येथील औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. त्यावेळी राजकारणात औरंगजेबाचा मुद्दा चर्चिला जात असताना आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. 

दरम्यान वंचितच्या उमेदवाराने कबरीचं दर्शन घेतल्याच्या घटनेनंतर नव्या वादाता तोंड फुटलं आहे. अफसर खान हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि महानगरपालिकेत 20 वर्षे नगरसेवक तसेच विरोधीपक्ष नेते पदावर होते. लोकसभा आचारसंहितेपूर्वी अफसर खान यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेशाच्या काही तासांच्या आतच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीवर खुद्द वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिक्का मोर्तब केला. अफसर खान यांनी 13 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरच्या खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली आणि दर्शन घेतलं. या घटनेनंतर लगेच विविध पक्षाच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात औरंगजेबाची एन्ट्री झाली आहे. 

हे ही वाचा - मविआच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी, महत्त्वाच्या जागा गमावल्या

या घटनेवर वंचितचे उमेदवार अफसर खान यांना माहिती विचारली असता ते म्हणाले, औरंगजेब हिंदुस्तानी नाही का? त्यांनी कोणालाही त्रास दिलेला नाही. त्यांच्या बद्दल अपप्रचार करण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरचे विधान परिषदेचे आमदार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले हा विषय खूप जुना झाला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी या विषयावर बोलताना सांगितलं की, हा विषय जुना झाला आहे. विकासाचे राजकारण करा, विकासावर बोला, लोकांना विकासाचे राजकारण आवडते या विषयावर बोलून अर्थ नाही. दिल्लीत बसलेले सत्ताधारी सुद्धा विकास करत नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली. महायुतीचे घटक पक्ष असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, औरंगजेबाच्या काही औलादी शहरात शिल्लक आहेत. या घटनेचे आश्चर्य वाटण्याची गरज नाही. आमच्या मूळ शिवसेनेचा लढा याच करिता होता. त्यामुळे शिवसेना वाढली. अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination