तिकिटासाठी लढल्या, पतीपेक्षाही जास्त मतं; 6 वेळा आमदार अन् पालकमंत्री असलेल्या नेत्याला केलं चितपट

सहा वेळा निवडणूक लढवलेले, तीन वेळा मंत्रिपद भूषविणारे भाजपचे वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

जाहिरात
Read Time: 3 mins
चंद्रपूर:

सहा वेळा निवडणूक लढवलेले, तीन वेळा मंत्रिपद भूषविणारे भाजपचे वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सुधीर मुनगंटीवार यांना इच्छा नसतानाही भाजपश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. मागील चार टर्म सलग खासदार राहिलेले हंसराज अहीर यांना तिकीट नाकारत सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. 

चंद्रपुरातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन जागा भाजप, दोन काँग्रेस आणि एक अपक्ष आमदार आहेत. मात्र अशाही परिस्थितीत भाजपला जबरदस्त पराभव आलं. येथील प्रतिभा धानोरकर यांना 6,18,943 मतं मिळाली असून सुधीर मुनगंटीवार यांना अवघ्या 3,94,527 मतांवर समाधान मानावं लागल्याचं सद्यपरिस्थितीत दिसून येत आहे. या जागेवरुन प्रतिभा धानोरकर यांनी चक्क 2 लाख 24 हजार 416 मतांची आघाडी मिळाली. काँग्रेसचे विजय वडेट्टीवारदेखील या जागेसाठी उत्सुक होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारत काँग्रेसने  प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. दिवंगत बाळू धानोरकर 2019 च्या लोकसभेत काँग्रेसमधून निवडून आलेले एकमेव खासदार. 30 मे 2023 रोजी त्यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर या जागेवरून बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर इच्छुक होत्या. यासाठी त्यांनी दिल्लीवारी केली. अखेर त्यांनी केलेला पाठपुरावा सफल ठरली असून चक्क त्यांनी दोन लाखांहून अधिक मतांची लीड मिळवली आहे.

Advertisement

प्रतिभा ताईंविषयी चंद्रपूरकरांमधील विश्वास...
ही निवडणूक प्रतिभा धानोरकरांच्या बाजूने जाऊ शकते असं सांगितलं जात होतं. यामागील पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे प्रतिभा यांच्यामागे असलेली सहानुभूती. या सहानुभूतीतून त्यांना मतदान केलं जाऊ शकतं असं म्हटलं जात होतं. दुसरी बाब म्हणजे जनतेमध्ये महिला म्हणून असलेला विश्वास. चंद्रपूर मतदारसंघात कुणबींची संख्या जास्त आहे. त्यात धानोरकर या धनोजे कुणबी समाजाच्या असल्याने त्यांना मतदान झालं असावं. 2019 लोकसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झालं होतं. तर यंदा हीच संख्या 67.55 % पर्यंत पोहोचली. त्यामुळे वाढलेली अडीच टक्के मतं कोणाच्या पारड्यात पडल्याचं सध्यातरी दिसून येत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - हनुमानाचा धावा केला तरीही...; अमरावतीत नवनीत राणाच्या पराभवाची महत्त्वाची 6 कारणं

2019 लोकसभा निवडणुकीत सुरेश धानोरकर 5 लाख 59 हजार 507 मतांनी विजयी झाले होते. यावेळी भाजपचे हंसराज अहिर यांना 5 लाख 14 हजार 744 मतं मिळाली होती. यावेळी 44 हजार 763 मताधिक्याने बाळू धानोरकर विजयी झाले होते.

Advertisement

सहा वेळा आमदार राहिलेल्या मुनगंटीवारांकडे निवडणुका लढवण्याचा आणि व्युहरचना आखण्याचा चांगला अनुभव आहे. त्याशिवाय येथून पालकमंत्री असल्याकारणाने त्यांच्याकडे जमेची बाजू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेऊन मुनगंटीवारांचा प्रचार केला. मात्र प्रतीभा धानोरकरांच्या बाबतीत पक्षांतर्गत वाद पाहायला मिळाला होता. विजय वडेट्टीवारांनी इथं झोकून देऊन काम करणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांनी इथं दोनच सभा घेण्यात आल्या होत्या. त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील कोणताही नेता त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात आला नाही. त्यामुळे धानोरकरांचा संपूर्ण प्रचार दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी केला. त्यामुळे एकत्रित पाहिलं तर मुनगंटीवारांचं व्यापक कॅम्पेनिंग झालं होतं.