लोकसभा निवडणुकीला सांगली पॅटर्न चांगलाच गाजला होता. लोकसभेला काँग्रेसने सांगलीत बंडखोरी करत विजयही मिळवला होता. सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीत सांगलीत पुन्हा तोच पॅटर्न पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे. काँग्रेसने सांगली विधानसभा मतदार संघातून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सांगलीत झालेली बंडखोरी ही भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सांगलीतील वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदार संघात जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. यशश्री पाटील या दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगलीमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेलाही सांगलीची निवडणूक चर्चेत राहीली होती. विधानसभेला इथं काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे. काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी या मतदार संघातून बंडखोरी केली आहे. त्या दिवंगत मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. मी पाच वर्षे तुमच्यासाठी राबलो आता पाच वर्षे मला द्या असं आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीकरांना केलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? थेट नाव सांगितलं, शिंदेंचा शिलेदार शेवटी बोललाच
यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरी बद्दलही वक्तव्य केलं आहे. काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी ही भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वसंतदादा बँकेचे ठेवीदार देशोधडीला लागले आहेत. या गोरगरीबांच पाप बंडखोरी करणाऱ्यांना लागणार आहे असंही ते म्हणाले. वसंतदादा बँकेची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी मदन पाटील याचे काही लोक त्याच्या गळ्याला लागले. त्यामुळेच हे बंड झाले आहे असे ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO
ही निवडणूक भाजपने वेगळ्या मार्गाला नेली आहे. मदन भाऊ मंचाचे काही कार्यकर्ते हे भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यांनी काँग्रेस संपवण्याचा डाव रचला आहेत. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचे सांगलीत खच्चीकरण केले जात आहे असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. मात्र असं असलं तरी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आपल्या मागे उभा आहे. बंडखोर हा स्पर्धेत नाही. त्यामुळे काँग्रेस विरूद्ध भाजप अशी लढत या मतदार संघात होत असल्याचे पृथ्वीराज पाटील म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world