संपत्ती वाटप आणि वारसा कर या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला की काँग्रेस वारसा कर लावण्याच्या मानसिकतेत आहे. यावरुन राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे.
राहुल गांधी यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी ज्या वक्तव्याबद्दल बोलत आहे, तसं काही मी बोललोच नाही. मी असं कधीही म्हटलं नाही की आम्ही वारसा कर लागू करु. मी फक्त समाजातील काही घटकांवर किती अन्याय झाला आहे, हे सांगत आहे.
(नक्की वाचा- 'काँग्रेसची लूट जिंदगी के बाद भी...' Inheritance Tax च्या मुद्यावर पंतप्रधानांचा हल्लाबोल)
यामध्ये एक आर्थिक आणि संस्थार्गंत सर्व्हे केला जाईल. ज्यातून समजण्यास मदत होईल की मागील काही वर्षात समाजातील विविध घटकांचा विकास कशाप्रकारे झाला आहे. सर्वांसाठी समाजिक, आर्थिक न्याय आणि समानता सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांच्या अमेरिकामधील 'वारसा टॅक्स' वक्तव्यावर हल्लाबोल केला. 'काँग्रेसचा धोकादायक संकल्प पुन्हा एकदा उघड झाला आहे. शाही परिवारमधील राजपूत्रांच्या सल्लागारानं काही वेळापूर्वी मिडल क्लास वर जास्त टॅक्स लावावा, असं सांगितलं होतं. आता हे त्याच्याही एक पाऊल पुढं गेले आहेत,' अशी टीका मोदी यांनी केली.
नक्की वाचा - 'रॉबर्ट वाड्रा अबकी बार...' अमेठीतील हटवली 'ती' पोस्टर्स
नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटलं की, काँग्रेस वारसा कर लावणार आहे. याचा अर्थ तुम्हाला वडिलोपार्जित मिळाणाऱ्या संपत्तीवरही कर लावला जाईल. तुम्ही कष्टानं मिळावलेली संपत्ती तुमच्या मुलांना मिळणार नाही. काँग्रेस सरकारचा पंजा ती हिसकावून घेईल. काँग्रेसचा मंत्र आहे, 'काँग्रेसची लूट जिंदगी के साथ और जिंदगी के बाद भी. तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला अतिरिक्त कर लादून मारेल, आणि तुम्ही गेल्यानंतर तुमच्यावर वारसा कराचा बोजा लादेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world