काँग्रेस नेत्यांच्या मुलींची वडिलांच्या CM पदसाठी फिल्डिंग, पटोलेनंतर वडेट्टीवारांच्या मुलीचीही बॅटिंग

काँग्रेस नेत्यांच्या मुलींनी त्यांचे वडिल मुख्यमंत्री व्हावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत आहे. त्याचबरोबर निकाल काय लागणार आणि मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात राज्यात मुख्य लढत होत आहे. या दोन्ही आघाडींनी किंवा त्यांच्यातील कोणत्याही पक्षानं मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. पण, काँग्रेस नेत्यांच्या मुलींनी त्यांचे वडिल मुख्यमंत्री व्हावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या पाठोपाठ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांच्या मुलीनं देखील वडिलांनासाठी बॅटिंग केली आहे. 

भाषणात शिव्यांची लाखोली

विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वड्डेटीवार यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील अकापूर गावात त्यांच्या भाषणा दरम्यान वीज गेली होती. त्यानंतर मोबाईलच्या उजेडात त्यांनी संपूर्ण भाषण पूर्ण केलं. या सर्व प्रकारानं शिवानी यांचा पारा चढला आणि त्यांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

तुमचं आयुष्य अंध:कारात टाकायचं याचा प्रयत्न भाजपा सरकार करतंय. त्या MSEB वाल्यांना झापणार तर आहेच. त्याची XXX केली तर माझं नाव शिवानी विजय वडेट्टीवार नाही.  भोXX इलेक्ट्रीसिटी बंद करायला निघाले आहेत. रात्रभर वीज बंद करतात तरी सा XX 800-1000 रुपये बिल पाठवतात, असे नालायक लोक आहेत. या लोकांची फजिती आम्ही करुच. भाजपा सरकारच्या भूलपाथांना बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

( नक्की वाचा : Vote Jihad : 'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले... )

आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री

शिवानी वडेट्टीवार यांनी यावेळी भाषण करताना त्यांच्या मनातील गोष्ट देखील सांगून टाकली. आपले आमदार मोठ्या पदाला जाऊ शकतात. पहिल्यांदा झालेल्या आमदाराला शिकायलाच पाच-दहा वर्ष जाऊ शकतात. निधी कुठून आणि कसा आणायचा हे शिकायलाच त्याला दहा वर्ष जातील. आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री असतो. त्यासाठी आपल्या क्षेत्राचा सर्वांगीन विकास करायचा असेल. अंधकारात टाकणाऱ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर विजय वडेट्टीवार यांना बहुमताने निवडून द्या, असं आवाहन शिवानी यांनी केलं. 

Advertisement

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पटोलेंच्या मुलीनं काय सांगितलं?

विजय वडेट्टीवार यांच्याप्रमाणेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कन्या प्रिया पटोले देखील निवडणूक प्रचारात सक्रीय आहेत. पटोेले यांच्या साकोली मतदारसंघात त्या वडिलांचा जोरदार प्रचार करत आहेत. 'मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मतदान करा', असं आवाहन प्रिया पटोले करत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार देखील लक्षवेधी ठरत आहे.

वडिलांसाठी प्रचारात उतरलेल्या लेकी

अंकिता हर्षवर्धन पाटील
पूर्वा दिलीप वळसे पाटील
जयश्री बाळासाहेब थोरात
शिवानी विजय वडेट्टीवार
श्रीजया अशोक चव्हाण
प्रिया सदा सरवणकर