लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार आता रंगात आलाय. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केलाय. काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध करताच भारतीय जनता पक्षानं त्यावर टीका केली होती. भाजपा प्रवक्त्यांनी काही तासांमध्येच या जाहिरनाम्याला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या मुद्यावर काँग्रेसला लक्ष्य केलंय. 'स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये मुस्लीम लीगचा जो विचार होता, त्याची छाप या जाहिरनाम्यावर जाणवतीय, असा आरोप पंतप्रधानांनी केलाय. या जाहिरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे. त्यामधून जो भाग बचावलाय त्यावर डाव्या पक्षांचं प्राबल्य आहे, यामध्ये काँग्रेस कुठंच दिसंत नाही, असं पंतप्रधानांनी म्हंटलंय.
उत्तर प्रदेशातील सहरानपूरमध्ये एका प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले की, 'स्वातंत्र्याचा लढा लढणारा काँग्रेस पक्ष काही दशकांपूर्वीच समाप्त झाला आहे. आता उरलेल्या काँग्रेसकडं देशाचं भलं करणारी नीती, तसंच राष्ट्रनिर्माण करणारी दृष्टी नाही. काँग्रेसनं काल (5 एप्रिल) जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावरुन हा पक्ष देशाच्या आशा-आकांक्षांपासून पूर्णपणे दूर गेला आहे, हे स्पष्ट होते.'
#WATCH | Addressing a public rally in Saharanpur, Prime Minister Narendra Modi says, "...Yesterday the kind of manifesto released by Congress reflects the same thinking that was prevalent in the Muslim League at the time of independence. The Congress manifesto completely bears… pic.twitter.com/g3UEf9nkkA
— ANI (@ANI) April 6, 2024
उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षावरही पंतप्रधानांनी यावेळी हल्लाबोल केला. 'समाजवादी पक्षाला दर तासाला उमेदवार बदलावे लागत आहेत. काँग्रेसची अवस्था तर आणखी विचित्र आहे. त्यांना उमेदवारच मिळत नाहीत. ज्या जागा बालेकिल्ला असल्याचा काँग्रेसचा समज आहे, तिथं उमेदवार उतरवण्याचं त्यांच्यात धाडस नाही. (उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात काँग्रेसनं अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही, त्याबाबत मोदींनी हा इशारा केला असल्याचं मानलं जात आहे.)
(2 खासदारांपासून संपूर्ण बहुमत मिळवण्यापर्यंतच पल्ला भाजपने कसा गाठला, वाचा सविस्तर)
'इंडी आघाडी हे अस्थिरता आणि अनिश्चिततेचं दुसरं नाव आहे. त्यामुळे त्यांची एकही गोष्ट देशात गांभीर्यानं घेतली जात नाही.' इथं उत्तर प्रदेशात ज्या दोन मुलांचा चित्रपट मागच्यावेळी फ्लॉप झाला होता तोच चित्रपट त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शित केला आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचं नाव न घेता लगावला.
(काँग्रेसचा जाहीरनामा आला... हुकमाचा एक्का टाकला, 'ही' आहेत 5 प्रमुख वैशिष्ट्य)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world