जाहिरात

Congress Mayor in 5 Municipal Corporation: 5 शहरांमध्ये बनणार काँग्रेसचा महापौर, कोणत्या आहेत या महानगरपालिका?

महानगरपालिका निवडणुकीत फारशा चर्चेत किंवा प्रचारात नसलेले काँग्रेस पक्षाचे तब्बल ३३० हून अधिक उमेदवार निवडून आले आहेत. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा दावा केला आहे.

Congress Mayor in 5 Municipal Corporation: 5 शहरांमध्ये बनणार काँग्रेसचा महापौर, कोणत्या आहेत या महानगरपालिका?

Congress mayors in 5 municipal corporations? राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल समोर आला आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान या निकालात अनेक अनपेक्षित गोष्टी समोर आल्या आहेत. या निकालात शिंदे गटालाही जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात असताना प्रत्यक्षात त्यांना ३९९ जागांवर यश मिळवता आलं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीत फारशा चर्चेत किंवा प्रचारात नसलेले काँग्रेस पक्षाचे तब्बल ३३० हून अधिक उमेदवार निवडून आले आहेत. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील पाच महानगरपालिकांवर काँग्रेसचा महापौर बसणार असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं.  

यावेळी सपकाळ म्हणाले, या महानगरपालिका  निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पक्षाचे सुमारे ३५० नगरसेवक संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये काँग्रेस आपले महापौर बसवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये लातूर, चंद्रपूर, भिवंडी, परभणी आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. किमान १० महानगरपालिकांमध्ये काँग्रेस सत्तेच्या समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. द हिंदूने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

कोणत्या आहेत त्या पाच महानगरपालिका? काय आहे तेथील समीकरण?

१ लातूर - 

लातूर महानगरपालिकेत ७० जागांपैकी काँग्रेसला ४३ जागांवर विजय मिळवता आला आहे. येथे काँग्रेस बहुमताचा आकडा पार केला आहे. तर या महानगरपालिकेत भाजपने २२ तर वंचितने ४ जागा जिंकल्या आहेत. 

२ चंद्रपूर - 

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस ३० जागांवर विजयी झाला आहे. तर येथे भाजप २३ जागांवर आहे. त्याशिवाय ठाकरे गट ६, वंचित १, इतर ४ विजयी झाले आहे. ६६ जागांच्या महानगरपालिकेत येथे काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. मात्र त्यांचे उमेदवार सर्वाधिक आहे. वरील ४ उमेदवारांसाठी काँग्रेस कोणासोबत जाईल हे लवकरच समोर येईल.   

३ भिवंडी - 

भिवंडी महानगरपालिकेतील ९० जागांपैकी भाजपला ३० जागा मिळाल्या आहेत. तर भाजप २२ जागांवर आहे. त्याशिवाय शरद पवार गटाला १२, अजित पवार गटाला १२ आणि इतर १४ जागांवर आहेत. येथेही काँग्रेसला बहुमत मिळालेले नाही. अशावेळी काँग्रेस महापौरपदासाठी बहुमताचं समीकरण कसं  साध्य करणार ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. 

४ परभणी - 

परभणी महानगरपालिकेतील ६५ जागांपैकी काँग्रेसला १२ तर उद्धव ठाकरे गटाला २५ जागा मिळाल्या आहेत. येथे भाजपचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. येथे बहुमतासाठी ३३ हा आकडा आहे. मात्र दोन्ही पक्षाकडे बहुमत नाही. अशावेळी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र येत सत्तास्थापन करण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. 

५ कोल्हापूर - 

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसला सर्वाधिक ३४ जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल भाजप २६ जागेवर आहेत. त्याशिवाय शिंदे गटाला १५ आणि अजित पवार गट ४, जनसुराज्य १ आणि ठाकरे गटाचे एक उमेदवार आहे. येथे बहुमताचा ४१ आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला ८ जागांची आवश्यकता आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट एकत्र आला तर सहज बहुमताचा आकडा गाठू शकतात. त्यामुळे येथे काँग्रेस काय गेम करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Who is Saee Thopte : सिम्बायोसिसमध्ये लेक्चर सुरू असतानाच तिकीट मिळाल्याचा फोन, 22 व्या वर्षी इतिहास रचणारी पुण्याची नवनिर्वाचित नगरसेवक कोण आहे?

नक्की वाचा - Who is Saee Thopte : सिम्बायोसिसमध्ये लेक्चर सुरू असतानाच तिकीट मिळाल्याचा फोन, 22 व्या वर्षी इतिहास रचणारी पुण्याची नवनिर्वाचित नगरसेवक कोण आहे?


काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक नव्हती. भाजपने सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून, तसेच बोगस मतदानाच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. मुंबईतील निकालांवर त्यांनी 'फिक्सिंग'चा आरोप केला असून प्रभाग रचनेपासून ते ईव्हीएम मशीनपर्यंत सर्वत्र फेरफार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसने ही निवडणूक एका विशिष्ट विचारधारेसाठी लढली. आम्ही कोणत्याही तत्त्वाशी तडजोड केली नाही. जरी आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी काँग्रेस आज राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आणि दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com