Nashik News : निवडणुकीपूर्वी 'कुबेर' आता मात्र....; नाशिकमधील उमेदवार मतदारांच्या घरोघरी फिरून करतोय मागणी

पराभव उमेदवाराच्या जिव्हारी लागलाय... या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik News : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका उमेदवाराने निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सोनं वाटलं होतं, मात्र निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तो मतदारांकडे पुन्हा सोनं मागण्यासाठी गेल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आधी सोन्याचं वाटप, पराभूत झाल्यानंतर सीसीटीव्हीची धमकी...

पराभूत झालेल्या उमेदवाराने चक्क मतदारांकडे दिलेले सोनं परत मागितल्याचा धक्कादायक प्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये उघडकीस आला आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवाराने  मतदारांना सोनं वाटप केलं होतं. मात्र पराभव झाल्यानंतर  हा उमेदवार मतदारांच्या दारात जाऊन जाब विचारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे लोकशाहीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या व्हिडिओमध्ये उमेदवार म्हणतो, तुमच्याकडे त्या सोन्याचा कोणताही पुरावा नाही. तुम्ही माझ्या घरी येऊन सोनं घेऊन गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज असल्याचं उमेदवार या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. 

नक्की वाचा - Nashik News : 'या' उमेदवारांना मतदान करणार नाही; नाशिकमधील एका गावातील ग्रामस्थांचा निश्चय , बैठकीत ठराव मंजूर

Advertisement

सोशल मीडियावर तुफान चर्चा...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. सोनं देऊन मत खरेदी करणाऱ्या उमेदवाराला मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्याच्या प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान मतदारांना आमिष दाखविल्या प्रकरणी पोलीस याकडे काय कारवाई करणार याकडे गावकऱ्यांचं लक्ष आहे.