जाहिरात

Delhi Election Result: अरविंद केजरीवालांचं आता काय होणार? 'आप' च्या पराभवाचे 7 प्रमुख परिणाम

Delhi Assembly Election Results 2025 : दिल्लीत भाजपानं 27 वर्षांनी सत्तेत पुनरागमन केलं आहे. आम आदमी पक्षाच्या पराभवाचा केजरीवाल यांच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

Delhi Election Result: अरविंद केजरीवालांचं आता काय होणार? 'आप' च्या पराभवाचे 7 प्रमुख परिणाम
मुंबई:

Delhi Assembly Election Results : दोन वेळा दणदणीत बहुमतासह सत्ता मिळवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला तिसऱ्या निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला आहे. स्वत: अरविंद केजरीवाल देखील पराभूत झाले आहेत. गेली पाच वर्ष दिल्लीचं राजकारण चांगलंच तापलं होतं. केजरीवाल आणि कंपनीवर अनेक प्रश्न विचारण्यात आले. केजरीवाल यांनी ती प्रश्नं नाकारली. आता मतदारांनी त्याचं उत्तर दिलं. भाजपानं 27 वर्षांनी सत्तेत पुनरागमन केलं आहे. आम आदमी पक्षाच्या पराभवाचा केजरीवाल यांच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो हे पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ब्रँड केजरीवाल उद्धवस्त

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातील चेहरा, स्वच्छ सरकार आणि प्रशासनाचं स्वप्न, राजकारणात भाजपा आणि काँग्रेसला पर्याय... सर्व काही सांगितलं गेलं. पण केंद्रीय एजन्सींची चौकशी सुरु होताच केजरीवाल यांच्या प्रतिमेला तडे गेले. दिल्लीतील निकालानंतर 'ब्रँड केजरीवाल' शी संबंधित सर्व चमकदार विशेषणं उद्धवस्त झाले आहेत. 

रेवडी राजकारण फेल

रेवडी राजकारणाला दिल्लीमधूनच मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. अरविंद केजरीवाल यांनी या निवडणुकीत अनेक गोष्टी मोफत देण्याचं आश्वासन दिलं होतं. केजरीवाल यांच्या आश्वासनाचा दिल्लीच्या मतदारांवर परिणाम झाला नाही. दिल्लीतील मतदारांनी दाखवलेली परिपक्वता आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांसाठी एक धडा असू शकतो. 

Delhi Election Result: दिल्लीत आम आदमी पक्षाचा 'दारु'ण पराभव का झाला? 5 महत्त्वाची कारणं

( नक्की वाचा :  Delhi Election Result: दिल्लीत आम आदमी पक्षाचा 'दारु'ण पराभव का झाला? 5 महत्त्वाची कारणं )

आपच्या विस्ताराला मर्यादा

आम आदमी पक्षाचा विस्तार यापूर्वीच मर्यादीत झाला आहे. त्यावर आणखी परिणाम होणार आहे. गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटकसह काही राज्यांमध्ये पक्षानं पाया तर रचला. पण त्यावर इमारत उभी करता आली नाही. काही ठिकाणी तर इमारतीला चांगलेच तडे गेले आहेत. आगामी पाच वर्षात केजरीवाल यांना दिल्लीमध्ये पक्षाचा हरवलेला जनाधार मिळवण्यावर फोकस करावा लागणार आहे. त्याचा थेट परिणाम अन्य राज्यातील आम आदमी पक्षाच्या विस्तारावर होणार आहे. 

भ्रष्टाचाराचा विळखा

केजरीवाससह 'आप' मधील अनेक मोठे नेते जेलमधून परतले आहेत. आता त्यांना दिल्लीच्या जनतेनं देखील नाकारलं आहे. दिल्लीतील जनादेशानं केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांची अडचण आणखी वाढणार आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्या भोवतीचा फास आगामी काळात आणखी आवळला जाऊ शकतो.  

Delhi Election Results 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा

( नक्की वाचा :  Delhi Election Results 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा )

विरोधी पक्षांमध्ये फूट

लोकसभा निवडणुकांना जेमतेम 8 महिने झाले आहेत. त्या निवडणुकीत काँग्रेस आणि आप दिल्लीत एकत्र होते. नेहरु आणि गांधी परिवारानंही 'आप'च्या उमेदवाराला मतदान केलं होतं. ही निवडणूक त्यांनी वेगळी लढवली. त्याचबरोबर दोन्ही पक्षांमधील संबंध देखील ताणले गेले आहेत. त्याचा परिणाम INDI आघाडीवर होणार आहे. 

बिहार निवडणुकीवर परिणाम

दिल्ली निवडणुकीचे परिणाम यावर्षाच्या शेवटी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. आम आदमी पक्षाच्या पराभावाचं खापर काँग्रेसवर फोडण्यात येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमधील महाआघाडीच्या जागा वाटपामध्ये याचे पडसाद उमटणार आहेत. 

आप-काँग्रेस संबंधांमध्ये कटूता

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं एकमेकांविरुद्ध आक्रमक प्रचार केला. आपच्या विरोधात काँग्रेसनं अनेकदा भाजपाचा मार्ग स्विकारला होता. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आम आदमी पक्षांच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या पराभवात काँग्रेस उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरली. केजरीवाल यांच्या राजकारणाचे स्वरुप पाहाता आगामी काळात ते याचा वचपा काढण्याची शक्यता आहे. ते अनेक ठिकाणी काँग्रेसचा खेळ बिघडवू शकतात. अर्थात काँग्रेस पासून दूर राहिल्यानंतर त्यांना फायदा होईल की तोटा हा वेगळ्या विश्लेषणाचा विषय आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: