जाहिरात

अमित ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात काय? फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत महायुतीची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.

अमित ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात काय? फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
मुंबई:

मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असं सध्या चित्र आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीमधून निवडणूक लढवतायत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे सदा सरवणकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे. 

माहीममध्ये अमित ठाकरे यांच्यासाठी महायुतीनं उमेदवार मागा घ्यावा अशी इच्छा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली होती. शेलार यांनी जाहीर इच्छा व्यक्त केल्यानंतरही सदा सरवणकर यांनी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज भरला. आपल्याला अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा देखील घेतली. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी माहीममध्ये अमित यांच्या विरोधात उमेदवार दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. मुख्यंंत्र्यांच्या मनात नेमकं काय आहे? हा प्रश्न विचारला जात होता.

सदा सरवणकरांचं ठरलं! मुख्यमंत्र्यांची परवानगी घेत जाहीर केला निर्णय

( नक्की वाचा : सदा सरवणकरांचं ठरलं! मुख्यमंत्र्यांची परवानगी घेत जाहीर केला निर्णय )

फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत महायुतीची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे आमने-सामने आले. त्यावेळी त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना फडणवीस यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली.

अमित ठाकरेंना पाठिंबा देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही ती इच्छा आहे. अमित ठाकरेंच्या विरोधातील मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडं जातील म्हणून त्यांनी उमेदवार दिला आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा होताच, असं त्यांनी यावेळी सांगितलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर माहीम मतदारसंघात महायुती विरुद्ध मनसे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा परिणाम मुंबईतील अन्य जागांच्या निवडणुकीवरही होऊ शकतो. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: