'मला सरकारमधून मोकळं करावं', देवेंद्र फडणवीस यांची मागणी

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबादारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याांनी स्विकारली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबादारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याांनी स्विकारली आहे. मला सरकारमधून मोकळं करावं अशी त्यांनी. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा फक्त 9 जागा जिंकता आल्या आहेत. 

काय म्हणाले फडणवीस?

या निवडणुकीचे नेतत्व भाजपमध्ये मी करत होतो त्यामुळे जागा कमी झाल्याची जबाबदारी मी स्वीकारतो. मी स्वत: कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करेन. भाजपला जो धक्का बसला त्याची जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस घेत आहे. मी पक्षाला विनंती करणार आहे की आता मला विधानसभेसाठी पूर्णवेळ उतरायचे आहे त्यामुळे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करत आहे की मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी.

( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
 

यापूर्वी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभा निवडणुकीत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

राज्य सरकारच्या स्थैर्यावर परिणाम?

महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये भाजपा मोठा पक्ष आहे. त्यानंतरही शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपानं घेतला होता.

Advertisement

एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्यात देवेंद्र फडणवीस सुरुवातीला तयार नव्हते. त्यांनी त्याबाबत तसं जाहीर देखील केलं होतं. पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर ते उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. सध्या फडणवीस यांच्याकडं उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपद देखील आहे. 

( नक्की वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेले महत्त्वाचे प्रश्न )

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमडळातून बाहेर पडण्याची विनंती केलीय. त्यामुळे नवा उपमुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळाच्या स्थैर्यावर याचा काय परिणाम होणार? हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. 

Advertisement