भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अपयशाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. भाजपानं लोकसभेच्या 28 जागा लढवल्या होत्या. त्यामधील त्यांना फक्त 9 जागा जिंकता आल्या आहेत.
(नक्की वाचा- महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?)
त्यामुळे मी पक्षाला विनंती करणार आहे की आता मला विधानसभेसाठी पूर्णवेळ उतरायचे आहे त्यामुळे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करत आहे की मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
(नक्की वाचा- 'मला सरकारमधून मोकळं करावं', देवेंद्र फडणवीस यांची मागणी)
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न महायुती, भाजप नेते आणि जनतेमध्ये निर्माण झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत, यावर एक नजर टाकुया.
- देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार म्हणजे सत्तेतून बाहेर पडणार का?
- एकनाथ शिंदे यांचं सरकार धोक्यात आलंय?
- देवेंद्र फडणवीसच सरकारबाहेर पडणार की भाजपचे इतर मंत्रीही बाहेर पडणार?
- भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटापासून अंतर निर्माण करतंय का?
- चंद्रशेखर बावनकुळे यांनाही राजीनामा द्यावा लागणार का?
- देवेंद्र फडणवीस यांंच्या वक्तव्याची भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला कल्पना होती का?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world