मर्दांचा पक्ष असाल तर आव्हान स्वीकारा! आशिष शेलारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या चर्चेसाठी हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे यांनी चर्चेला पुढे यावे असे आव्हान आशिष शेलार यांनी दिले आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

इको सिस्टीममध्ये राष्ट्रीय पक्षांचे नेते देखील शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा चालवू पाहात आहेत. आदित्य ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बगल दिली आहे. उत्तरे देता येत नसल्याने त्यांनी इको सिस्टीमला पुढे करण्याचा आणि आम्हाला प्रश्न विचारण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शिवाय हिंम्मत असेल तर चर्चेसाठी पुढे या असे आव्हानही शेलार यांनी आदित्य यांना दिले आहे.    

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आशिष शेलार पुढे म्हणाले की माझे आदित्य ठाकरेंना आव्हान आहे. हिम्मत असेल तर चर्चेला पुढे या. आपले पिता कोणतीही शंका व्यक्त न करता देखील प्रत्येक सभेत आम्ही मर्दांचा पक्ष आहोत हे न विचारताही सांगत असतात. माझं खुलं आव्हान आहे, की मर्दांचा पक्ष असाल तर आदित्य  ठाकरे यांनी माझे आव्हान स्वीकारावे. धारावी पुनर्विकास या मुद्दावर खुल्या चर्चेला यावे. सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे असे शेलार म्हणाले. आदित्य ठाकरे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील किंवा माहिती नसेल तर आमच्या बिचाऱ्या वर्षाताईंना पुढे करू नका. त्यांची अडचण निर्माण करू नका, असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - महायुती सरकारला दणका! निवडणूक आयोगाने 'ते' निर्णय केले रद्द, महामंडळाच्या नियुक्त्यांवरही गाज

 गरीब धारावीकराच्या घराच्या स्वप्नाला तुमचा विरोध का ? असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाअंतर्गत बेघरांना घर या अधिकारापासून धारावीतील मराठी, मुस्लिम आणि दलित बांधवांना तुम्ही वंचित का ठेवू पाहात आहात, असेही ते म्हणाले. धारावीकरांना अधिकृतरित्या  पुनर्विकसित घर मिळणार नाही, अशा खोट्या अफवा पसरवून त्यांची माथी भडकावली जात आहे. त्यातून मराठी, मुस्लिम आणि दलित बांधवांत अशांतता निर्माण केली जात आहे. शहरी नक्षलवाद्यांची भूमिका याचे मविआ आणि आदित्य ठाकरे तुम्ही पुरस्कर्ते का होत आहात ? असा प्रश्नही त्यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...

धारावीतील जनतेला अधिकृत घरे मिळणारच नाहीत, असे खोटे पसरवून त्यांची माथी भडकावून त्यांची मते मिळवण्याचा व्होट जिहादचा प्रयत्न आदित्य ठाकरे का करत आहेत, असेही शेलार म्हणाले. 7 लाख लोकं धारावी बाहेर जाणार आहेत हे सपशेल खोट आहे. कारण अजून सर्व्हेच झालेला नाही. सर्व्हेला काँग्रेस आणि आदित्य ठाकरेंचा विरोध का ? असेही शेलार म्हणाले.  तुम्ही अतिबुद्धीवान असाल तर मुंबईत तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना धारावीतील अपात्र रहिवाशांना संरक्षित करून घर देण्याचा प्रयत्न का केला नाही? का कायदा केला नाही? गरीब विरोधी का राहिलात? असेही शेलार यांनी सांगितले. नेचर पार्काची जागा प्राणी मित्र युवकांसाठी बळकावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून होत आहे. ही 37 एकर मोकळी जागा पुत्रप्रेमासाठी बळकावायची असल्याने धारावी पुनर्विकासाला विरोध आहे, असा आरोपही त्यांनी केला.  

ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांनी विरोधकांना हात जोडले, थेट बोलले, पण का?

दरम्यान सध्याच्या राजकीय स्थितीवर ही आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी नाना पटोलेंना हाडतुड केल्याची माहिती मला समाजमाध्यमांवरून मिळाली. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करत आहे. जिथे-जिथे मविआ आणि संजय राऊत-नाना पटोले उपस्थित असतील त्या ठिकाणासाठी नवी नियमावली बनवावी. पादत्राणे बाहेर काढावीत. अंगरक्षकांना बाहेर काढावे, खासगी शस्त्रे असतील तर ती बाहेर ठेवावीत. बैठकांच्या ठिकाणी पुरेसे पोलीस संरक्षण द्यावे. कारण आता ते गुद्दागुद्दीवर आलेत. उद्या ते गोळीबारावर येऊ शकतात. ही मला भीती आहे. नाहीतर इथे गँगवॉर होण्याची शक्यता आहे असा टोमणाही शेलार यांनी मारला.  

ट्रेंडिंग बातमी - खोटा पोलीस बनून 50,000 लुटण्याचा प्रयत्न, तरुणीचं डेअरिंग अन् खेळ खल्लास

महायुतीत मविआसारखी तूतू मैमै न करता अतिशय प्रेमाने जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. इतर नेत्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर तुमच्याकडे वॉशिंग मशिन आहे का ? हे टोचून बोलण्याचा प्रकार उद्धव ठाकरे करत होते. घर फोडलं. पक्ष फोडला असे आरोप त्यावेळी ठाकरे करत होते. आता  जी लोकं आमच्याकडून तुम्ही घेत आहात, त्याबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा की आमच्या उकीरड्यावर तुम्ही पोट भरताय? आमच्या पडलेल्या शितांवर तुमचं पोट भरण्याचे काम सुरू आहे, असा प्रश्न विचारावा का? असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  10 वीत 100 पैकी 100 गुण, डोळ्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न, पण शेतमजुराच्या लेकी बरोबर भयंकर घडलं

संजय राऊत नवाब मलिकची वकिली का करत होते असा प्रश्नही शेलार यांनी केला आहे.  संजय राऊत बॉम्बस्फोटातील आरोपीची प्रचारात मदत का घेत होते. संजय राऊत आणि दाऊदचा काही संबंध आहे का? हा देखील लोकांच्या मनात प्रश्न आहे. भाजपला दाऊदशी संबंधित कुठल्याही उमेदवाराबद्दल मान्यता नाही. संजय राऊतांना उत्तर द्यायचं असेल तर  त्यांनी प्रकाश आंबेडकरांची प्रेस ऐकावी. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे की शरद पवार दाऊदला भेटले. संजय राऊत तेव्हा तुम्ही तर नव्हतात ना, हे महाराष्ट्राला उत्तर द्या. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.