विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी लाडकी बहीण योजना असणार आहे. सत्ताधाऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून प्रचार करण्याची रणनिती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लाडकी बहीण योजनेचे महत्व सांगताना विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. लाडकी बहीणी बद्दल सांगताना ही योजना 'मी' कशी आणली हे सांगायला ते विसरले नाहीत. शिवाय ही योजना 'मी' बंद पडू देणार नाही हा दादाचा वादा आहे सांगितले आहे. ही योजना बंद करण्याचे स्वप्न विरोधक बघत आहेत त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी यात केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. त्यांनी या व्हिडीओत विरोधकांना हात जोडले आहे. मी विरोधकांना हात जोडून विनंती करतो, मी जी तुम्हाला शिविगाळ करायची आहे ते निश्चित करा पण लाडकी बहीण योजनेबाबत करोडो कुटुंबाची स्वप्न जोडलेली आहेत. त्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे. या योजने बाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांना ही योजना बंद करायची आहे. त्यांचे ते स्वप्न आहे. असे स्वप्न पाहाणाऱ्या विरोधकांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला धडा शिकवा असे आवाहन त्यांनी महिला मतदारांना केले आहे. शिवाय काही झाले तरी हा दादा ही योजना बंद पडू देणार नाही असे ही त्यांनी सांगितले आहे. ऐवढेच नाही तर या योजनेची रक्कमही वाढवण्याचा आपलाय प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.
अजित पवार असं ही म्हणतात अनेक बहीणींचे प्रेम आणि आशिर्वाद आपल्याला भेटले आहेत. त्यामुळे मी जगातील सर्वात भाग्यवान दादा आहे. यावेळचे रक्षाबंधन कधीही विसरणार नाही. जे प्रेम आणि ताकद मिळाली आहे त्यामुळे आपली जबाबदारी जास्त वाढली असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळे तुम्हाला बळ देण्यासाठी हा दादा कधीही कमी पडणार नाही हा या दादाचा वादा आहे असेही अजित पवार या व्हिडीओत सांगत आहेत. शिवाय विरोधक जी खोटी माहिती पसरवत आहेत त्याचा जाब बहीणींना विचारावा लागणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...
लाडकी बहीण योजनेचा निर्णय आपण घेतल्याचे ते यात सांगताना दिसत आहे. या योजनेची अर्थमंत्री म्हणून मीच घोषणा केली. लाडक्या बहीणीला पायावर उभं राहण्यासाठी ही योजना आणली. आतापर्यंतचं हे माझ्या राजकीय प्रवासातील हे सर्वात मोठे पाऊल होते असेही ते म्हणाले. मात्र विरोधक बहीणींच्या मनात भ्रम पसरवत आहेत. सुरूवातीला या योजनेची अंमलबजावणी होणार नाही असं विरोधक सांगत होते. पण अंमलबजावणीला सुरूवात झाली. अर्ज भरण्यात आले. त्यावर पैसे जमा होणार नाहीत असं विरोधक म्हणत होते. पण लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यावेळी ही योजना जास्त दिवस चालणार नाहीत असेही विरोधक म्हणाले. पण ही योजना मी बंद होवू देणार नाही असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - खोटा पोलीस बनून 50,000 लुटण्याचा प्रयत्न, तरुणीचं डेअरिंग अन् खेळ खल्लास
बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यांना रक्षाबंधनाची ओवळणी दिली आहे. शिवाय त्यांना भाऊबीजही दिली आहे. त्यामुळे विरोधक हे भेदरले आहेत. ते घाबरले आहेत. त्यामुळेच ते खोटा प्रचार करत आहेत. बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. असं असलं तरी तुमचा हा दादा तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहाणार आहे असेही ते म्हणाले. सरकार पुन्हा आले तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले. त्याच बरोबर विरोधक ही योजना बंद करण्याचे बोलत आहेत. पण तुमच्या राखीची शपथ घेवून सांगतो ही योजना बंद पडू देणार नाही असे आश्वासन ही अजित पवार यांनी दिले. शिवाय विरोधकांना या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world