सुनिल कांबळे
अदिती अंगद यादव. हीचं वय होतं अवघं 17 वर्षाचं. धाराशीवच्या विजोरा यागावात राहाणारी मुलगी. आई वडील दोघेही शेतमजूर. अदिती अभ्यासात प्रचंड हुशार. बिकट स्थितीतही तिने दहावीत 100 पैकी 100 गुण मिळवले. आई वडील शेतमजूर. त्यामुळे गरीबी पाचवीला पुजलेली. त्यामुळे खुप शिकायचं मोठं व्हायचं आणि आई बाबांना सुखात ठेलायचं अशी तिची इच्छा होती. त्यासाठी तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहीले. त्या दृष्टीने पहिलं पाऊलही टाकलं. लातूरच्या नामांकीत राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश मिळवला. पण समोर मोठा संघर्ष आहे हे तिच्या लक्षात आहे. कितीही हुशार असलो. कितीही मेहनती असलो. तरी पैशा पुढे काहीच नसते याची तिला जाणिव झाली. अन् नको तेच घडलं. तिनं टोकाचं पाऊल उचललं. अंगावर काटा आणणारी ही घटना लातूरमध्ये घडली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एक हुशार आणि होतकरू तरूणीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. अदिती अंगद यादव या सतरा वर्षाच्या तरूणीने कॉलेजच्या होस्टलमध्ये गळफास घेऊन आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचललं. मात्र तिने हा पाऊल का उचललं याचं कराण ऐकाल तर तुमच्या पाया खालची वाळू सरकेल. अदिती ही लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. 17 ऑक्टोबरच्या रात्री तिने गळफास लावून घेतला. आई वडील हे शेतमजूर होते. शिक्षणाचा खर्च आवाक्या बाहेर जात होती. शिक्षणसाठी लागणारी पुस्तकं. वसतीगृहाचे भाडे, जेवण असा सर्व खर्च लाखाच्या घरात जात होता.
ऐवढे पैसे आणणार कुठून. घरची स्थिती बेताची. लेकीला शिकवायचं म्हणून आई वडील काबाड कष्ठ करत होते. ही तिला बघवत नव्हतं. पुढे आणखी खर्च वाढणार. यातून आई वडीलांनाच त्रास होणार. याबाबत ती तिच्या मित्र मैत्रिणीं बरोबर नेहमी बोलत होती. यातून ती नैराश्यात गेली होती. शेवटी तिने मागचा पुढचा कोणताही विचार न करता वसतीगृहातच रात्री गळफास घेत आपले जीवन संपवले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. याबाबत लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुलीने दहावीला पैकीच्या पैकी गुण मिळवले. पुढे जाऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहीले तिने असे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळही व्यक्त केली जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...
अदितीच्या आई वडीलांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ते हादरून गेले. काही वेळ त्यांना या वाईट बातमीवर विश्वासच बसला नाही.अदितीच्या आईने तर टाहो फोडला. लग्नाच्या 12 वर्षानंतर अदितीचा जन्म झाला होता. त्यामुळे ती घरातली लडकी होती. त्यामुळे तिच्या जाण्याने तिचे कुटुंबीय धक्क्यात आहेत. मुलींनी शिक्षण मोफत आहे असं सांगितलं जातं. पण आम्ही गरीब असूनही एक लाख खर्च करत होतो. या पैशानेच तिचा जिव गेला असा आरोप तिच्या आईने केला आहे. ती नेहमी खर्चाबाबतच बोलायची, पुढे काय होईल असं सांगायची असं तिची आई सांगत होती.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांनी विरोधकांना हात जोडले, थेट बोलले, पण का?
खर्च वाचवण्यासाठी तिने मेसचा डब्बाही बंद केला होता. मुलींसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम घेऊन वसतीगृहात प्रवेश दिला जातो. तर 40 हजार रुपये वार्षिक भाडे आकारले जाते. तसेच मेस साठी वर्षाला 30 हजार रुपये आकारले जाताता. अदितीने वर्षासाठी मेसला तीस हजार रुपये भरले होते. तिला पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती सुद्धा दिली होती अशी माहिती शाहू महाविद्यालयाचे प्रशासकीय समन्वय श्रीहरी तलवारे यांनी दिली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे तिने आपल्या आई वडीलांना फोन केला होता. तिने छान गप्पाही मारल्या होत्या. तिचा हा शेवटचा फोन कॉल ठरला. त्यानंतर ती थेट वसतीगृहात आली अन् आपलं जिवन संपवलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world